BJP's 1 Lakh WhatsApp Groups Are the Party's Voice, Bawankule tells Raut
Sakal
महाराष्ट्र बातम्या
Chandrashekhar Bawankule : 'आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपवर बोलणारे संजय राऊत कोण? भाजपच्या डिजिटल वॉररूमवर टीका होताच बावनकुळे संतापले
Bawankule Hits Back at Sanjay Raut Over WhatsApp Group Criticism : भाजपचे एक लाख व्हॉट्स ॲप ग्रुप वॉर रूमशी जोडलेले असल्याचा खुलासा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला, तसेच यावर टीका करणारे संजय राऊत हे भाजपला काय करावे हे ठरवणारे कोण, असा संतप्त सवाल विचारून पलटवार केला.
नागपूर : ‘‘भाजप बूथप्रमुखांचे एक लाख व्हॉट्स ॲप ग्रुप पक्षाच्या वॉररुमसोबत जोडलेले आहेत. याबाबत ते सर्वजण अवगत आहेत. या माध्यमातून सरकारच्या कल्याणकारी योजना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत आम्ही पोचवत असतो. पक्षामध्ये कार्यकर्त्यांसोबतचा संवाद याच व्हॉट्स ॲप ग्रुपच्या माध्यमातून होतो,’’ असे स्पष्टीकरण महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

