
Eknath Shinde : हम 'सर्वांगीण' विकास करना चाहतें हैं... मुख्यमंत्र्यांचं हिंदी ऐकलं का?
नागपूरः पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नागपूरमध्ये मोदींच्या हस्ते ७५ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन झाले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण पार पडलं.
या समृद्धी महामार्गावर १९ टोलनाके आहेत. नागपूर ते शिर्डी ५२० कि.मी.च्या प्रवासासाठी ९०० रुपये टोल भरावा लागणार आहे. या लोकार्पण सोहळ्यामध्ये सुरुवातीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोगत व्यक्त केलं. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नव्या प्रकल्पांविषयी माहिती दिली. पंतप्रधानांच्या अगोदर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले.
हेही वाचाः सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?
मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषणाची सुरुवात मराठीत केली. त्यानंतर ते हिंदीत बोलायला लागले. त्यांच्या हिंदीतले मराठी शब्द ऐकून प्रत्येकालाच हसू आवरलं नसेल. 'हम महाराष्ट्र का सर्वांगीण विकास करना चाहतें हैं...' अशी त्यांनी मराठीमिश्रीत हिंदी वाक्यं होती.
हेही वाचा: PM Narendra Modi: मोदींचा नागपूर दौरा आणि 'वायफळ' शब्दाची चर्चा; काय आहे कारण?
''ये रोजगार देनेवाला वेगवान महामार्ग हैं, ये रास्ता पोहोचेगा, इससे किसानों का फायदा होगा, ये सर्वसामान्य लोगों कि सरकार हैं...'' हे शब्द ऐकून खुद्द पंतप्रधान आवाक् झाले नसतील तर नवलच.
दरम्यान, सकाळी पंतप्रधान मोदी नागपूरमध्ये दाखल झाल्यानंतर रेल्वे स्थानकाकडे रवाना झाले. सुरुवातीला त्यांनी वंदे भारत एक्स्प्रेसला हिंरवा झेंडा दाखवला. त्यानंतर त्यांनी नागपूर मेट्रोच्या फेज २चं लोकार्पण केलं. त्यांनी मेट्रोतून प्रवास केला. त्यानंतर 'एम्स'सह समृद्धी महामार्गाचं लोकार्पण पंतप्रधानांनी केलं.