
PM Narendra Modi: मोदींचा नागपूर दौरा आणि 'वायफळ' शब्दाची चर्चा; काय आहे कारण?
नागपूरः पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ७५ हजार कोटींच्या विकासकामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन पंतप्रधान करतील. मात्र या दौऱ्यादरम्यान एका शब्दाची भलतीच चर्चा होत आहे. तो शब्द म्हणजे वायफळ. नेमकं हे प्रकरण काय ते पाहूया.
पंतप्रधानांच्या उपस्थित लोकार्पण सोहळ्यात विविध कार्यक्रम होत आहेत. समृद्धी महामार्गाचं लोकार्पण आणि नागपूर मेट्रो टप्पा २ ची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. नरेंद्र मोदी काही वेळापूर्वी नागपूर विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर त्यांनी वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. मग मेट्रो फेज-२चं लोकार्पण करत त्यांनी मेट्रोतून प्रवास केला. मग समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण झालं.
या समृद्धी महामार्गावर १९ टोलनाके आहेत. नागपूर ते शिर्डी ५२० कि.मी.च्या प्रवासासाठी ९०० रुपये टोल भरावा लागेल. या टोलनाक्यांमध्ये एक 'वायफळ' नावाचा टोलनाका आहे. या टोलनाक्यावर पंतप्रधान पोहोचले तेव्हा सर्वांच्याच भूवया उंचावल्या. सोशल मीडियावर या वायफळ शब्दाची आणि पंतप्रधानांच्या दौऱ्याची चर्चा रंगलीय. पंतप्रधानांनी नुकतंच समृद्धी महामार्गाचं लोकार्पण केलं आहे.
वायफळ शब्द आणि मोदींचा दौरा, यावरुन नेटकऱ्यांना भरपूर मटेरियल मिळालंय. त्यावरुनही ट्रोलिंग सुरु झालीय.