

Scorching heatwave grips Nagpur as temperatures soar above 45°C, raising concerns over heat stroke and public safety.
esakal
राज्यात उन्हाचा कडाका जीवघेणा ठरू लागला आहे. विदर्भात उष्णतेची लाट असून नागपूरमधील परिस्थिती विशेषतः गंभीर बनली आहे, उष्माघातामुळे एकाच दिवसात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या २४ तासांत नागपूरमध्ये तापमानात लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. मंगळवारी (१९ मे) तापमान ४५.५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते.