Early counting trends of the Nagpur Municipal Corporation Election 2026 indicate a strong lead for BJP across multiple wards during vote counting.
esakal
महाराष्ट्र बातम्या
Nagpur Municipal Election Results 2026 : नागपूर महापालिकेचे पहिले कल समोर, भाजपची मुसंडी, तब्बल ६५ जागांवर आघाडी
Nagpur : ही निवडणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नागपूरमध्ये होत आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या मतदानात ४१.२३% मतदानाची नोंद झाली. २०१७ मध्ये १०८ जागा जिंकणाऱ्या भाजपाकडून यंदाही सत्ता कायम राखण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज सकाळपासून सुरू झाली आहे. सायंकाळपर्यंत बहुतेक निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. नागपूर महानगरपालिकेत एकूण १५१ जागांसाठी निवडणूक झाली असून, भाजपा-शिवसेना (शिंदे गट) गठबंधनाने मजबूत कामगिरी दाखवली आहे.

