आरटीई प्रवेश नोंदणीसाठी राज्यातील शाळा निरुत्साही; नोंदणीकडे फिरवली पाठ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Schools in the state are reluctant to register for RTE admission

नागपूर विभागातील गडचिरोली व औरंगाबाद विभागातील जालना, उस्मानाबाद जिल्ह्यातील एकाही शाळेने आरटीई प्रवेशाकरिता नोंदणी केली नाही. आरटीई प्रवेश नोंदणीकरिता राज्यातील केवळ १४९५ शाळांनी नोंदणी केली असून १६ हजार ९०८ जागा आहेत. 

आरटीई प्रवेश नोंदणीसाठी राज्यातील शाळा निरुत्साही; नोंदणीकडे फिरवली पाठ

नंदोरी (जि. वर्धा) : वंचित व आर्थिक दुर्बल घटकांसाठी २५ टक्‍के राखीव कोट्यातून शाळेत प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यापूर्वी आरटीई प्रवेशासाठी शाळांनी नोंदणी करणे अनिवार्य आहे. शाळा नोंदणीसाठी २१ ते ३० जानेवारीपर्यंत मुदत होती. परंतु, या कालावधीत राज्यातील केवळ १४९५ तर नागपूर विभागातील २५१ शाळांनी नोंदणी केली आहे. विशेषतः नागपूर विभागातील गडचिरोली तर औरंगाबाद विभागातील जालना व उस्मानाबाद जिल्ह्यातील एकाही शाळेने नोंदणी केली नाही.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरटीई प्रवेश प्रक्रिया डिसेंबर २०२० पर्यंत लांबणीवर पडली होती. यंदाही आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक विस्कटणार हे निश्‍चित. शिक्षण हक्क कायद्यानुसार समाजातील आर्थिक व दुर्बल घटकांसाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्‍के राखीव जागा ठेवण्यात येतात. राखीव कोट्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना चांगल्या शाळेमध्ये प्रवेश मिळतो. त्यामुळे आरटीई प्रवेशाकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

नक्की वाचा - बारा मुलींचा पार्थिवाला खांदा, लाडक्या वडिलांना लेकींचा अखेरचा निरोप

या प्रवेश प्रक्रियेसाठी शाळांची शिक्षण विभागाकडे नोंदणी होणे आवश्‍यक आहे. असे असले तरी यंदा राज्यातील शाळांचा नोंदणीसाठी निरुत्साह असल्याचे दिसून येत आहे. नागपूर विभागातील गडचिरोली व औरंगाबाद विभागातील जालना, उस्मानाबाद जिल्ह्यातील एकाही शाळेने आरटीई प्रवेशाकरिता नोंदणी केली नाही. आरटीई प्रवेश नोंदणीकरिता राज्यातील केवळ १४९५ शाळांनी नोंदणी केली असून १६ हजार ९०८ जागा आहेत. 

नागपूर विभाग 

जिल्हा शाळा नोंदणी आरटीई जागा
भंडारा १४ १४७
चंद्रपूर ७५ ६८८
गोंदिया ९३ ५८९
गडचिरोली ०० ०० 
नागपूर ४१ ३६९ 
वर्धा २८ २९३ 
एकूण २५१ २०८६

Web Title: Nagpur News Schools State Are Reluctant Register Rte Admission

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top