

नागपूरमधील राड्यावर खासदार उदयनराजे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकशाहीचा ढाचा रचण्याचे काम केले नागपूरमधील राड्याचे समर्थन कोणीच करत नाही. पण काही मूठभर लोक समाजात विद्वेष निर्माण करतात, त्यांना कोणतीही जात नसते अशा लोकांना ठेचण्याचे काम समाजाने केले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारच या देशाला अखंड ठेवू शकतात. कारण त्यांचे विचार हे सर्वसमभावाचे, एकात्मतेचे, ऐक्याचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारच आपल्याला भविष्यात महासत्तेकडे घेऊन जाणार आहेत.