अधिवेशन संपताच मंत्रिमंडळ विस्तार; अजितदादा गटाला आणखी एक कॅबिनेट, दोन राज्यमंत्रिपद वाट्याला येण्याची शक्यता!

हिवाळी अधिवेशन (Nagpur Winter Session) संपताच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
Nagpur Winter Session
Nagpur Winter Sessionesakal
Summary

येत्या काळात विस्तारात अजित पवार गटाला आणखी एक कॅबिनेट, दोन राज्यमंत्रिपद वाट्याला येण्याची शक्यता आहे.

नागपूर : हिवाळी अधिवेशन (Nagpur Winter Session) संपताच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता असून, यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला आणखी एक कॅबिनेट व दोन राज्यमंत्रिपदे वाट्याला येणार आहेत. विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या शेजारीच वाईचे आमदार मकरंद पाटील होते. अजित पवार यांनी मकरंद पाटील (Makarand Patil) लवकरच मंत्रिपदाची शपथ घेतील, असे सांगितल्याने मकरंद पाटील यांना मंत्रिपदाचे गिफ्ट मिळणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी गणेशोत्सव, दसरा, दिवाळी असे मंत्रिमंडळ विस्ताराचे दिलेले मुहूर्त याआधीच हुकले आहेत. त्यामुळे आता हा विस्तार होणार नाही, असे चित्र असताना हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Nagpur Winter Session
Nitesh Rane : मुस्लिमांविरोधात नितेश राणेंचं 'ते' वक्तव्य अत्यंत भयंकर; राष्ट्रवादीच्या नेत्याकडून कारवाईची मागणी

त्यामुळे आता येत्या काळात इच्छुक मंडळींकडून मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू असल्या तरी विस्तार होत नसल्याने मंत्रिपदाची आस असलेल्या अनेकांचा हिरमोड झाला होता. काही जणांनी तर आता विस्तार होणार नाही, म्हणून मंत्रिपदाची आशा सोडली होती. भाजपनेही मंत्रिपद मिळेल, याची अपेक्षा न ठेवता लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश भाजपच्या सर्व आमदारांना दिले होते.

Nagpur Winter Session
विधिमंडळात पेटलं कोयनेचं पाणी! जयंत पाटील, विश्‍वजित कदम, विक्रम सावंत आक्रमक; सरकारला धरलं धारेवर

इच्छुकांच्या आशा पल्लवित

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी प्रसार माध्यमांशी बोलताना मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत दिल्याने इच्छुक मंडळींच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात राज्यातील शिंदे-फडणवीस-अजित पवार महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांना लवकरच गिफ्ट मिळणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

पवार गटाला एक कॅबिनेट, दोन राज्यमंत्रिपद?

येत्या काळात विस्तारात अजित पवार गटाला आणखी एक कॅबिनेट, दोन राज्यमंत्रिपद वाट्याला येण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशन संपताच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

Nagpur Winter Session
मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री झाले, पण आतापर्यंत आरक्षण मिळालं नाही; भाजप आमदारानं व्यक्त केली खंत

मंत्रिपद फायनल

अजित पवार प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांच्या शेजारी साताऱ्याचे आमदार मकरंद पाटील बसले होते. त्यावेळी अजित पवार यांनी मकरंद पाटील लवकरच मंत्रिपदाची शपथ घेतील, असे सांगितले. त्यामुळे त्यांचे मंत्रिपद फायनल मानले जात आहे. मकरंद पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवेळी ते अजित पवारांसोबत दिसले होते, तर शरद पवारांच्या सातारा दौऱ्यात ते पवारांच्या गाडीतून प्रवास करताना दिसले. मात्र, त्यानंतर ते अजित पवार यांच्या गटात दाखल झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com