
नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या साहित्य संमेलनाध्यक्ष पदासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, संत आणि लोकसाहित्याचे अभ्यासक, डॉ. रामचंद्र देखणे आणि विचारवंत जनार्दन वाघमारे यांची नावे सुचविली.
पुणे - नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या साहित्य संमेलनाध्यक्ष पदासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, संत आणि लोकसाहित्याचे अभ्यासक, डॉ. रामचंद्र देखणे आणि विचारवंत जनार्दन वाघमारे यांची नावे सुचविली.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
संमेलनाध्यक्षांची निवड ही सन्मानाने केली जात असल्याने ‘मसाप’ने या पदासाठी तीन नावे सूचित केली आहेत. डॉ. नारळीकर गेली अनेक वर्षे विज्ञानविषयक लिखाण करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाचा विचार करण्यात आला आहे. डॉ. देखणे हे संत साहित्याचे अभ्यासक आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण लिखाण आणि वाघमारे यांचे साहित्यिक योगदान यामुळे या सर्वांची नावे साहित्य महामंडळाला सुचविल्याचे मसापमधील सूत्रांनी सांगितले.
सिरमच्या लसीचा वाद कोर्टात; 'कोव्हिशिल्ड'बाबत कंपनीचे स्पष्टीकरण
स्वागताध्यक्षासाठी भुजबळांसह तिघांची नावे
नाशिक - नाशिकमध्ये होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदासाठी तीन जणांची नावे चर्चेत आहेत. मराठी साहित्य महामंडळाची बैठक येथे येत्या २३ आणि २४ रोजी होत आहे.
बैठकीत संमेलनाध्यक्षाची घोषणा होणार आहे. त्यानंतर स्वागताध्यक्षपदाची घोषणा होऊन विविध समित्यांची स्थापना केली जाणार आहे. स्वागताध्यक्षासाठी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार हेमंत गोडसे, मविप्रच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार यांच्या नावाची चर्चा आहे.
Edited By - Prashant Patil