

Maharashtra State Commission women Chairperson
ESakal
अशोक खरात प्रकरणाच्या संदर्भात रूपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. फसवणूक करणारा अशोक खरातला महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यानंतर अशोक खरातची अनेक गैरकृत्ये उघडकीस आली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांचा खरातसोबतचा एक फोटो आणि त्या त्याच्या पायांची पूजा करत असल्याचा एक व्हिडिओ समोर आल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती.
अखेर त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे राजीनामा सोपवला आहे. यानंतर आता महाराष्ट्र महिला आयोगाच्या पुढील अध्यक्ष कोण होणार? असा सवाल उपस्थित झाला होता. यानंतर आता यासाठी २ नावे चर्चेत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात आता खळबळ उडाली आहे.