Namo Shettale Abhiyan 7 thousand shettale will be set up in state maharashtra news
Namo Shettale Abhiyan 7 thousand shettale will be set up in state maharashtra news

Namo Shettale Abhiyan: शेतकऱ्यांसाठी ‘नमो शेततळे’ अभियान! राज्यात 7 हजार शेततळे उभारणार

Namo Shettale Abhiyan : रब्बी हंगामात दुष्काळाला तोंड देत, फळबाग शेती वाचविण्यासाठी शेततळे उपयुक्त ठरतात.

त्यामुळे राज्य शासन ‘नमो शेततळे’ अभियान राबवीत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात सात हजार ३०० शेततळे उभारले जाणार आहेत. इच्छुक शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात ८० टक्क्यांहून अधिक जमीन कोरडवाहू आहे. त्यामुळे ‘नमो शेततळे’ अभियान शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणार आहे. नैसर्गिक अडचणींवर मात करण्यासाठी शेतावर शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा उभारून पाण्याची साठवणूक करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढावे यासाठी पाणी साठवणूक वाढविणे, तसेच मत्स्य व्यवसाय, शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा उभी करण्यास चालना देण्याच्या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात ‘नमो शेततळे अभियान’ राबविण्यास मान्यता देण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेच्या ‘मागेल त्याला शेततळे’ या घटकांतर्गत उभारण्यात येणाऱ्या शेततळ्यांचा समावेश या अभियानांतर्गत उभारण्यात येणाऱ्या शेततळ्यांमध्ये करण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेंतर्गत उपलब्ध निधीतून ‘नमो शेततळे’ अभियान राबविण्यात येईल.

Namo Shettale Abhiyan 7 thousand shettale will be set up in state maharashtra news
Agriculture Success Story : फिटिंग, रिपेअरिंगचं काम करणाऱ्या व्यक्तीने शेतीतून काढले 30 लाखांचे उत्पन्न

या अभियानामुळे शेतीला कायमस्वरूपी सिंचन सुविधा मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल, अशी शासनाला अपेक्षा आहे. योजनेची अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

शेततळे बांधकामासाठी अटी-शर्ती

- शेततळे बांधण्याचे आदेश प्राप्त झाल्यापासून तीन महिन्यांत काम पूर्ण करणे

- कामासाठी कोणतेही आगाऊ पैसे दिले जात नाही

- शेततळ्याची देखभाल, दुरुस्तीसाठी लाभार्थी जबाबदार

- शेततळे पूर्ण झाल्यानंतर सातबारा उतारावर त्याबद्दलची नोंदणी करणे आवश्यक

- शेततळे पूर्ण झाल्यावर स्वखर्चाने शेततळे योजनेचा बोर्ड लावावा

- बांधावर झाडांची लागवड करणे अनिवार्य

- नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई नाही

- गरज पडल्यास प्लॅस्टिकच्या अस्तराचा खर्चही शेतकऱ्यांनी स्वतः करावा

Namo Shettale Abhiyan 7 thousand shettale will be set up in state maharashtra news
Crop Insurance Scheme : अग्रिमची साडेतीन लाख शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दिवाळीत रकमेचे शासनाचे आश्वासन हवेतच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com