Nana Patole: आम्ही मोठे बंधु नाही.. नाना पटोलेंचं चक्क एक पाऊल मागे, सकाळ सर्व्हेचा दिला संदर्भ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nana Patole

Nana Patole: आम्ही मोठे बंधु नाही.. नाना पटोलेंचं चक्क एक पाऊल मागे, सकाळ सर्व्हेचा दिला संदर्भ

गेल्या काही दिवसांपासून मोठा भाऊ लहान भाऊ यावरून महविकासआघाडीमदध्ये वाद पेटला आहे. मविआत राष्ट्रवादीच मोठा भाऊ असं वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केलं होतं. त्यानंतर मविआतील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आले. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक पाऊल मागे अशी भूमिका घेतली आहे. त्यांच्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (nana patole big statement on maha Vikas Aghadi which brother is big maharashtra politics)

एका वृत्तवाहिनीशी बोलताना मविआसंदर्भात नाना पटोले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. दोन तीन पक्ष एकत्र येतात तेव्हा अनेक घडामोडी घडत असतात. त्याला आलबेल नाही अंस म्हणता येत नाही. सर्वजण आम्ही एक भूमिका घेऊन पुढे जाणार आहोत.

आम्हाला देश वाचवायचा आहे. देशाची संविधानिक व्यवस्था वाचवायची आहे. आणि आमची भूमिका प्रामाणिक आहे. काँग्रेसची नेहमी देश हिताची भूमिका राहिली आहे. त्यामुळं अनेक घडामोडी या घडत राहितील असं सांगत नाना पटोले यांनी सकाळ सर्व्हेचा संदर्भ दिला.

सकाळ सर्व्हेमध्ये मविआला ४३ टक्के जनतेनं दिलं आहेत. त्याच्यामुळं काँग्रेस हा त्यामध्ये मोठाच भाऊ आहे. पण आमची मोठ्या भावाची भूमिका नाही. आम्ही समन्वयक आहोत. मोठा भाऊ असा कधी आम्ही आव आणला नाही. देश वाचवण हा आमचा उद्देश आहे. त्यामुळे मोठ्यापणाचा गर्व नाही. असं स्पष्ट नाना पटोले बोले आहेत.

त्यांच्या या वक्तव्यानंतर नाना पटोले यांनी एक पाऊल मागे अशी भूमिका घेतली आहे. अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

यापूर्वी अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर संजय राऊत कोण मोठा आणि कोण छोटा हे तपासण्यासाठी डीएनए टेस्ट करावी लागेल, असे वक्तव्य केले होते.