esakal | ज्यांना सत्ता दिली त्यांनीच काँग्रेसचा घात केला, पटोलेंचा शरद पवारांवर हल्लाबोल
sakal

बोलून बातमी शोधा

sharad pawar nana patole

सत्ता दिली त्यांनीच काँग्रेसचा घात केला, पटोलेंचा पवारांवर हल्लाबोल

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : जमीनदारीच्या वक्तव्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (maharashtra congress president nana patole) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर (NCP president Sharad Pawar) जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसने कधीही जमीनदारी केली नाही. काँग्रेस काही जमीनदाराचा पक्ष नाही. काँग्रेसने ज्यांनी सत्ता दिली, त्यांनीच काँग्रेसचा घात केला. अशाप्रकारच्या प्रतिक्रिया देऊन काँग्रेसचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, २०२४ मध्ये काँग्रेसचेच पंतप्रधान होतील, असे नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा: ईडीच्या कारवाया म्हणजे राज्याच्या अधिकारावर गदा - शरद पवार

'काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेश च्या जमीनदारासारखी झालीय. जो आपल्या हवेलीवर उभा राहून सगळी हिरवळ आपलीच आहे, हे सांगतो' असं म्हणत शरद पवारांनी काँग्रेसला डिवचलं होतं. त्यानंतर पटोले यांनी पलटवार केला आहे. काँग्रेसने अनेक लोकांना जमीन राखायला दिली होती. अनेकांनी तीच जमीन चोरली. त्यामुळेच काँग्रेसची ही अवस्था झाली असावी, असं पवारांना वाटत असावं. देशात भाजपला काँग्रेसच पर्याय आहे. त्यामुळे काँग्रेसचाच पंतप्रधान बनेल, असे पटोले 'TV9 मराठी'शी बोलताना म्हणाले.

पवारसाहेब खूप मोठे नेते आहेत. त्यांच्याबद्दल काही बोलणं मी टाळतो. पण, त्यांनी पक्षावर वक्तव्य केलं आहे. लोकशाहीमध्ये कोणाला काही बोलायचं असेल तर त्यांचा अधिकार आहे. त्यांनी काय बोलावं त्यांचा प्रश्न आहे. दुसऱ्या पक्षांच्या नेत्यांबद्दलच्या प्रतिक्रिया देऊ नये. मात्र, अशा मोठ्या नेत्यांना आम्ही सांगू शकत नाही. कुणाच्या म्हणण्यानं काही होत नाही. काँग्रेसचा दबदबा आजही कायम आहे. लोकशाहीत लोक ठरवत असतात, कुण्या नेत्याच्या म्हणण्यानं काँग्रेस पक्षाला काही फरक पडत नाही. 2024 मध्ये काँग्रेसचं सत्तेत येईल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केलाय.

loading image
go to top