esakal | ईडीच्या कारवाया म्हणजे राज्याच्या अधिकारावर गदा - शरद पवार
sakal

बोलून बातमी शोधा

ईडीच्या कारवाया म्हणजे राज्याच्या अधिकारावर गदा - शरद पवार

हिंदू - मुस्लिमांचे पूर्वज एक आहेत असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं होतं. याबाबत विचारले असता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

ईडीच्या कारवाया म्हणजे राज्याच्या अधिकारावर गदा - शरद पवार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व पक्षांच्या नेत्यांना गर्दी होईल अशा कार्यक्रमांचे आयोजन करू नये आणि स्वत: उपस्थित राहू नये असं आवाहन केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनानुसार आपण कार्यक्रमात उपस्थित राहणार नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शरद पवार म्हणाले की, जुन्नरला कार्यक्रमाला जाण्याआधी मी सर्व परवानग्या घेतल्यात का हे विचारून घेतलं होतं. त्यांनी अशा परवानग्या घेतल्याचं सांगितलं. त्यानंतर मी कार्यक्रमाला उपस्थित झालो पण सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन कार्यक्रमात झालं नसल्याचं दिसून आले. इथून पुढे अशा प्रकारचे कार्यक्रम स्वीकारू नयेत असं मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे त्यानुसार मी कार्यक्रमांना जाणार नाही. गर्दी होणाऱ्या कार्यक्रमात न जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं.

हेही वाचा: गणेशोत्सवात निर्बंधाची शक्यता, तीन दिवसांत नियमावली

हिंदू - मुस्लिमांचे पूर्वज एक आहेत असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं होतं. याबाबत विचारले असता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, मोहन भागवतांच्या विधानाने माझ्या ज्ञानात भर पडली.

ईडीकडून सुरु असलेल्या कारवायांबद्दल विचारले असता शरद पवार यांनी म्हटलं की, याआधी कधी ईडीच्या इतक्या कारवायांबद्दल ऐकलं होतं का? ईडीच्या कारवाया म्हणजे राज्याच्या अधिकारांवर गदा असल्याचं म्हणत शरद पवार यांनी केंद्रावर निशाणा साधला. भावना गवळींना विनाकारण ईडीकडून त्रास दिला जात असल्याचं पवार म्हणाले.

हेही वाचा: समृद्धी महामार्ग: जालना-नांदेड द्रुतगती महामार्गाचा शासन निर्णय जारी

आरबीआयच्या नव्या धोरणालाही त्यांनी विरोध दर्शवला. विशिष्ट लोकांच्या हाती देऊन सहकार क्षेत्र संपवण्याचा कट असल्याचा आरोप शरद पवार यांनी केंद्रावर केला. नागरी सहकारी बँका बंद करण्याचं रिझर्व्ह बँकेचं नवं धोरण असल्याचं म्हणत त्यांनी रिझर्व्ह बँकेच्या नव्या धोरणाला विरोध केला. सहकार हा सामान्यांना सन्मान देणारी विचारधारा आहे. ते संपवण्याचा प्रयत्न केला तर सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे असे ते म्हणाले.

loading image
go to top