Video: ...अखेर सत्य बाहेर आलंच: नाना पटोलेंनी फडणवीसांचा 'तो' Video केला शेअर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nana patole-devendra fadnavis

Video: ...अखेर सत्य बाहेर आलंच: नाना पटोलेंनी फडणवीसांचा 'तो' Video केला शेअर

मुंबई : राज्यातील मोठमोठे प्रकल्प बाहेर गेल्याने राज्यातील वातावरण तापलं आहे. त्याचबरोबर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. तर काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन हे प्रकल्प जाण्यामागे मविआ सरकार कसं जबाबदार आहे हे सांगितलं. त्याचबरोबर कालच्या पत्रकार परिषदेत त्यांनी बच्चू कडू यांच्यासंदर्भात एक मोठा गौप्यस्फोट केला.

(Nana Patole vs Devendra Fadnavis)

माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहटीला गेले होते असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यानंतर कालचा त्यांचा तो व्हिडिओ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पोस्ट केला आहे. अखेर मुखातून सत्य बाहेर पडलं असं कॅप्शन देऊन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. तर यावरून देवेंद्र फडणवीस आता ट्रोल होत आहेत.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत सेनेचे अनेक आमदार गुवाहटीला गेले होते. तर शिवसेनेतील या फुटीमागे फडणवीसांचा कसलाच हात नसल्याचं सांगण्यात येत होतं पण फडणवीसांनी अखेर आपल्या फोन कॉलमुळे एक आमदार गुवाहटीला गेल्याचं स्पष्ट केलं आहे.