भंडारा पोलिसांनी 'त्या' मोदीला पकडलंय, नाना पटोलेंची माहिती

akola news Nana Patole's statement is a battle for supremacy for the post of Congress leader
akola news Nana Patole's statement is a battle for supremacy for the post of Congress leader

रविवारी संध्याकाळी घेतलेल्या प्रचार सभेत नाना पटोले (Nana Patole) यांनी ‘मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो’ असे वक्तव्य केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर राज्यात भाजपा पटोलेंविरोधात आक्रमक झाली आहे. आज दिवसभर राज्यात भाजपच्या नेत्यांनी नाना पटोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी केली. काही ठिकाणी भाजपच्या नेत्यांना ताब्यातही घेण्यात आलं. यानंतर नानांनी मोठा खुलासा केला आहे. (Nana Patole on Modi)

नाना पटोले यांनी व्हिडीओमध्ये बोलताना उल्लेख केलेल्या मोदींबद्दल त्यांनी महत्वाची माहिती दिली आहे. या मोदी नावाच्या व्यक्तीला भंडारा पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे, असं पटोले म्हणाले. संबंधित व्यक्ती गुंड असून पोलीस त्याची चौकशी करत असल्याचंही नाना म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपवरही हल्ला केला.

पोटोले यांनी मोदी नावाच्या व्यक्तीला मारू शकतो, आणि शिव्याही देऊ शकतो असं वक्तव्य केलं. यानंतर नव्या काँट्रोव्हर्सीला जन्म मिळाला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर व्हिडीओ व्हायरल झाला आणि एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना म्हणाले, ‘मी आमच्या एका गाव गुंडाबद्दल बोलत होते, त्याचं नाव मोदी आहे. तुम्हाल कोणता मोदी म्हणायचा आहे’ असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. यानंतर सगळीकडे वादंग चालू आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही पटोलेंवर टीका केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com