नाना पटोलेंना अटक करा, गडकरी आक्रमक | Gadkari: Arrest Nana Patole | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gadkari: Arrest Nana Patole

नाना पटोलेंना अटक करा, गडकरी आक्रमक

रविवारी सायंकाळी घेतलेल्या प्रचार सभेत काँग्रेस प्रदेशाध्क्ष नाना पटोले यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. 'मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो' असे वक्तव्य केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावर नाना पटोले यांनी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली होती.(Nana Patole Statement about Modi) "मी आमच्या एका गाव गुंडाबद्दल बोलत होते, त्याच नाव मोदी आहे. तुम्हाला कोणता मोदी म्हणायचा आहे" असा प्रश्न केला होता . यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आता यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितीन गडकरी यांनीसुद्धा ट्विट द्वारे अटकेची मागणी केली आहे. (Gadkari: Arrest Nana Patole)

केंद्रीय मंत्री नारायण राणे ट्विटद्वारे म्हणाले, " काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्याचा मी निषेध करतो काँग्रेस नेते या पातळीवर घसरले याचे मला आश्चर्य वाटत नाही" सोबत राणे आणखी एक ट्विट करीत म्हणाले, "नाना पटोलेंना अटक करावी, हि पोलिसांची जबाबदारी आहे. हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे."

सोबत यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा ट्विट करीत नाना पटोले यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर नाना पटोलेंच्या अटकेची मागणी केली आहे. नितीन गडकरी यांनी ट्विट करत म्हटले," पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह व निंदनीय आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, की पटोलेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी"

काँगेस प्रदेशाद्यक्ष नाना पटोले यांच्या या वादग्रस्त वक्तव्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता केंद्रीय मंत्र्याकडून अटकेच्या मागणीने नाना पटोले अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Web Title: Arrest Nana Patole Gadkari Aggressive

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..