Raj Thackeray | राज ठाकरेंवर कारवाई करा; औरंगाबादेतील भाषणानंतर 'आप'ची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

After Raj Thackeray  speech in Aurangabad  AAP demanded action against him

राज ठाकरेंवर कारवाई करा; औरंगाबादेतील भाषणानंतर 'आप'ची मागणी

राज्यात हनुमान चालिसा आणि भोंगे हे दोन मुद्दे सध्या चर्चेत आहेत. यादरम्यान आज औरंगाबादेत झालेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणात त्यांनी ४ मे नंतर भोंगे बंद झाले नाहीत तर मशिदींपुढे दुप्पट आवाजात हनुमान चालिसा वाजवू असा नवा अल्टिमेटम दिला आहे, यावर आम आदमी पक्षाकडून राज ठाकरेंवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

राज ठाकरे यांनी आज केलेल्या भाषणानंतर आम आदमी पक्षाने राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे, धार्मिक कार्यक्रम करण्याचा आवाहन नव्हतं तर ती धमकी होती, महाराष्ट्रातील शांतता अशा स्थितीत घेऊन जाण्याची धमकी होती ज्यामध्ये दोन्ही समूदायामध्ये काहीही करू शकतात, त्यांना चिथावणी दिली जात आहे. असे आप प्रवक्त्या प्रीती शर्मा मेनन म्हणाल्या आहेत.

माझी ही मागणी आहे की त्यांच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे, असे कोणतेही मोठे नेते असले तरी ते शांततेवर हल्ला करणार असतील तर त्यांना अटक करणं गरजेचं आहे, असे त्या म्हणाले.

राज ठाकरे यांनी भोंगे हा धार्मिक मुद्दा नाही तर सामाजिक प्रश्न असल्याचे सांगितले आहे, यावर बोलताना त्या म्हणाल्या की, जर हा धार्मिक मुद्दा नाही तर हनुमान चालिसाचा मुद्दा कुठून आला, तुम्ही तिकडे जाऊन दुसरं काहीही करू शकता, नाशिक ढोल वाजवा त्यांनी ते नाही सांगितलं, तर हनुमान चालिसा वाजवा असं सांगितलं असतं. जनता खुळी नाही, राज ठाकरे काय करतायत ते सगळ्यांना कळत आहे. अवघड स्थिती निर्माण केरण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुळे त्यांच्यावर कारवाई केली जावी अशी मागणी करत असल्याचे त्या म्हणाल्या.

टॅग्स :Raj Thackerayaap