esakal | नाना पटोले महाराष्ट्रातील 'पप्पू' - चंद्रकांत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

नाना पटोले

नाना पटोले महाराष्ट्रातील 'पप्पू' - चंद्रकांत पाटील

sakal_logo
By
अमित उजागरे

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठवलेल्या पत्रावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी पटोले टीकास्त्र सोडलं. नाना पटोले हे राज्यातील पप्पू आहेत, अशा शब्दांत त्यांनी संभावना केली. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाजपची बाजू मांडली. (Nana Patole is one of Pappu from Maharashtra Chandrakant Patil)

चंद्रकांत पाटलांनी अमित शाह यांना पाठविलेल्या पत्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संबंधित दोन कारखान्यांचा उल्लेख करण्यात आला होता. यावरुन निशाणा साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आरोप केला होता. यावर भाष्य करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, "राष्ट्रीय पातळीवर जसे एक पप्पू आहेत तसेच नाना पटोले हे महाराष्ट्रातील पप्पू आहेत. ते त्यांच्या मनाला येईल ते बोलत असतात. आपण पत्रासोबत पाठवलेली यादी ही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तयार केलेली आहे. तसेच जरंडेश्वर साखर कारखान्याच्या बाबतीत जसा गैरव्यवहार झाला तसा प्रकार गडकरींबाबत झालेला नाही. त्यांनी याबाबत यापूर्वीच खुलासा केला आहे."

निवडणुका रद्द झाल्या तरी ओबीसींना होणार नाही फायदा

राज्यातील पाच जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत पंचायत समित्यांच्या काही जागांची पोटनिवडणूक कोरोनाच्या साथीमुळे पुढे ढकलण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं यावळी पाटील यांनी स्वागत केलं. ते म्हणाले, "कोरोनाची साथ कमी झाल्यावर या निवडणुका होतील त्यावेळी नव्याने अर्ज दाखल करता येणार नाहीत. भाजपनं सर्व जागांवर केवळ ओबीसींना उमेदवारी दिली आहे. पण इतर पक्षांनी तसं केलेलं नाही. आता निवडणूक स्थगित झाल्यामुळे पुढे निवडणूक होताना ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाला तरी त्याचा लाभ समाजाला होणार नाही. परंतु, भाजपनं मात्र सर्व जागांवर ओबीसींना उमेदवारी देऊन आपली बांधिलकी पाळली आहे.

loading image