Eknath Shinde says Bap to Bap Hota Hai : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांवरून काँग्रेसचे आमदार नाना पटोले आज विधानसभेत चांगलेच आक्रमक झाले होते. यावेळी त्यांनी थेट विधानसभा अध्यक्षांच्या जवळ जाऊन तेथील राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला. तसेच, "मोदी हा तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा नाही," अशा शब्दांत त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीकाही केली.