विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी फडणवीसांना भेटलोय - नाना पटोले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

politics

निवडणूक बिनविरोध करण्याची राज्याची परंपरा आहे.

'विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी फडणवीसांना भेटलोय'

सध्या राज्यात विधान परिषदेची पोट निवडणुक आहे. राज्यभर या निवडणूकांचे वारे वाहू लागेल आहे. कॉंग्रसेचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नीला तिकीट दिले आहे. निवडणूक बिनविरोध करण्याची राज्याची परंपरा आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेटलो आहे. चंद्रकांत पाटील यांनीही त्यांचे मत मांडले आहे. पक्षातील नेत्यांशी चर्चा करुन लवकरच देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील, अशी प्रतिक्रीया कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

राज्यभर सुरु असणाऱ्या एसटी आंदोलनाविषयी विचारले असता ते म्हणाले, एसटी आंदोलन हा चिंतेचा विषय आहे. राज्य सरकारने त्यांच्या मागण्यांना मान्यता दिली आहे. पण तरीही पुन्हा एसटी कर्मचारी मैदानात उतरले आहेत. याबाबतीत भाजपची दुटप्पी भूमिका आहे. केंद्रात खासगीकरण झाले आहे त्याचे काय? असा सवालही त्यांनी केला. एसटी कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजप राजकारण करत आहे. एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत घ्या, अशी कॉंग्रेचीही भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: 'BMC चे टेंडर जनतेसाठी नव्हे तर काँट्रॅक्टरच्या मेव्यासाठी'

परमबीर यांच्याबद्दल विचारेल असता ते म्हणाले, देशाच्या इतिहासात पहिल्यांदा अशी घटना झाली की, आरोपी बाहेर आणि वकील आत आहे. ज्याने आरोप लावले त्याला कुणाचा पाठिंबा होता. त्यांना गायब करण्यात भाजपचा हात असावा, कारण आरोप करणारी व्यक्ती गायब आहे. सर्व पुरावे जवळ नसतानाही राज्य सरकारला भाजप का बदनाम करत आहे? असा सवालही केला आहे. हे सर्व खुनशी राजकारण असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्या नागपुर दौऱ्यासंबंधी विचारले असता ते म्हणाले, त्यांच्या या दौऱ्याचा आणि त्यांच्या पक्षवाढीच्या विचारा संबंधित आम्हाला काहीही अडचण नाही. सर्वांनी आपला पक्ष वाढवावा. आम्ही बारामतीमध्ये गेलो तर त्यांना अडचण नसावी, एवढीचं माफक अपेक्षा.. असेही ते म्हणाले.

हेही वाचा: हिवाळी अधिवेशन नागपुरातच! विधीमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत निर्णय

loading image
go to top