BMC चे टेंडर जनतेसाठी नव्हे तर काँट्रॅक्टरच्या मेव्यासाठी - नितेश राणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Nitesh Rane

भाजपा आणि शिवसेनेतील नेतेमंडळी एकमेकांवर टीका करत असतात.

'BMC चे टेंडर जनतेसाठी नव्हे तर काँट्रॅक्टरच्या मेव्यासाठी'

मुंबई - मुंबई महापालिकेच्या अनेक मुद्द्यांवरून विरोधक आणि सत्ताधारी नेत्यांत एकमेकांवर टीका सुरु असते. कधीकधी त्या नकारात्मक तर अनेकवेळा नाव न घेता एकमेकांवर ताशेर ओढले जातात. आता पुन्हा एकदा भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेना आणि मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ट्विट करत त्यांना शिवसेनेवर वसूलीसेना असा घणाघात केला आहे.

हेही वाचा: देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी नाना पटोले सागर बंगल्यावर

ते म्हणतात, वसूलीसेनेची सत्ता असलेली मुंबई महानगर पालिका ही टेंडर जनतेच्या सेवेसाठी काढत नाही, तर काँन्ट्रॅक्टरच्या मेव्यासाठी काढते. आणि हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. #BMC असा तिखट टोला त्यांनी लगावला आहे. दरम्यान भाजपा आणि शिवसेनेतील नेतेमंडळी एकमेकांवर टीका करत असतात. दरम्यान रझा अकादमीच्या विषयावरून हे कार्यकर्ते समाज माध्यमांवर अफवा पसरवत असताना पोलिसांचा गुप्तचर विभाग काय करतो. रझा अकादमीला मोर्चे काढण्यास परवानगी का दिली? असे सवालही त्यांनी केले होते. या मुद्द्यावरुन त्यांनी शिवसेना नेत्यांवर निशाणा साधला होता.

हेही वाचा: हिवाळी अधिवेशन नागपुरातच! विधीमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत निर्णय

loading image
go to top