
नांदेड : नांदेडचे काँग्रेस पक्षाचे खासदार वसंतराव चव्हाण (वय ७०) यांचे सोमवारी (ता.२६) पहाटे चार वाजून पाच मिनिटांनी निधन झाले. हैदराबादच्या किम्स रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. मागील दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. उद्या (ता. २७) त्यांच्या पार्थिवावार नायगाव येथे सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.