esakal | नांदेड : कोविशिल्ड ट्रेडमार्कवर नांदेडच्या कंपनीचा दावा, न्यायालयात याचिका दाखल 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

संबंध जगभारात सध्या कोरोना लसीकरणाची तयारी सुरु आहे. त्यातच देशात सीरम इन्स्टिट्यूटने लस तयार केली आहे. परंतु तिच्या नावावरुन नांदेडच्या क्युटीस बायोटेक कंपनीने दावा केला आहे.

नांदेड : कोविशिल्ड ट्रेडमार्कवर नांदेडच्या कंपनीचा दावा, न्यायालयात याचिका दाखल 

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : संबंध जगभरातील शास्त्रज्ञांनी जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाची लस निर्माण करण्यासाठी चंग बांधला. त्यात पुणे येथील सीरम कंपनीने कोविशिल्ड लस निर्माण करुन तिला ट्रेडमार्क देण्यात यावा अशी मागणी केली. मात्र यापूर्वीच या नावाने आपल्या औषधीला कोविशिल्ड ट्रेडमार्क मिळावा यासाठी नांदेडच्या एका औषधी कंपनीने दावा केला होता. सिरम कोविशिल्ड कंपनीच्या दाव्याविरोधात पुन्हा नांदेडची कंपनी न्यायालयात गेली आहे. या प्रकरणाची सुनावणी ता. १८ डिसेंबर रोजी होणार आहे. 

संबंध जगभारात सध्या कोरोना लसीकरणाची तयारी सुरु आहे. त्यातच देशात सीरम इन्स्टिट्यूटने लस तयार केली आहे. परंतु तिच्या नावावरुन नांदेडच्या क्युटीस बायोटेक कंपनीने दावा केला आहे. क्युटीसने कोविशिल्ड हा ट्रेडमार्क आमचा असून त्याचा इतर कुणी वापर करु नये अशा प्रकारचा दावा नांदेड न्यायालयात दाखल केला. याबाबतची सुनावणी येत्या ता. १८ डिसेंबर रोजी होणार आहे. याबाबतची माहिती अशी की क्युटीस बायोटेक ही कंपनी अर्चना आशिष काबरा यांच्या वतीने अॅड. मिलिंद एकताटे, अॅड. आनंद बंग आणि अॅड. आदित्य राजशेखर यांनी हा दावा दाखल केला आहे.

हेही वाचा - नांदेड : दिल्लीतील शेतकरी आंदोलनास गुरुद्वारा बोर्डाचा पाठिंबा ; लंगर सेवा सुरू -

त्याबाबत अॅड. एकताटे म्हणाले की, क्युटीस बायोटेक कंपनीने २० एप्रिल २०२० रोजी या नावाने वर्ग पाचमध्ये ट्रेडमार्ककडे अर्ज करुन नोंदणी केली होती. परंतु प्रतिवादी सिरम इन्स्टिट्यूट आणि फार्मास्युटिकल कंपनीचे भंडारु श्रीनिवास यांनी हे नाव वापरले. अशाप्रकारे आमच्या नावाची ट्रेडमार्क अगोदर नोंदणी असताना वापरलेल्या नावावर आक्षेप होता. त्यामुळे क्युटीसचे कर्नाटक, महाराष्ट्र, हरियाणा या राज्यातील या सॅनिटायझरच्या मागणीवर परिणाम होऊन नुकसान होणे स्वाभाविक होते. त्यामुळे हा ट्रेडमार्क आमचा असल्याबाबत आम्ही न्यायालयात दावा दाखल केला आहे.
याबाबत आता ता. १८ डिसेंबरला सुनावणी होणार असल्याचे ते म्हणाले.

या नावाने इतरही उत्पादने 

क्युटीसचे आशिष काबरा म्हणालेकी, कोविशिल्ड नावाने फक्त सॅनिटायझर नाही. तर अन्यही उत्पादने आहेत. त्यात अॅन्टीसेफ्टीक लिक्वीड, फ्रुट अॅन्ड व्हिजीटेबल वाॅश हे उत्पादने आहेत. येत्या काळात कोविशिल्ड नावाने सीरप, टॅबलेट यासह इतर उत्पादन सुरु करण्यात येणार आहेत. 

loading image