

Devgoi Ghat School Bus Accident
ESakal
नंदुरबारमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नंदुरबारच्या देवगोई घाटात स्कूल बस दरीत कोसळून मोठा अपघात झाला आहे. या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तर अनेक विद्यार्थ्यांसह चालक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रशासनाकडून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.