Video: राणे ज्या पक्षात जातात त्या पक्षाची सत्ता जाते...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

पुणेः नारायण राणे ज्या पक्षात जातात त्या पक्षाची सत्ता जाते, असा खोचक प्रश्न एका महिला पत्रकाराने राणेंनाच विचारला. संबंधित व्हिडिओ व छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुणेः नारायण राणे ज्या पक्षात जातात त्या पक्षाची सत्ता जाते, असा खोचक प्रश्न एका महिला पत्रकाराने राणेंनाच विचारला. संबंधित व्हिडिओ व छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'द रिट्रिट' हॉटेलमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (ता. 12) संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबतच जाणार असल्याची भूमिका स्पष्ट केली. ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. राणे यांनी भाजपचेच सरकार आणण्याची तयारी आम्ही सुरु केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ही जबाबदारी माझ्या खांद्यांवर टाकली आहे, असे पत्रकारांना सांगितले. यावेळी एका महिला पत्रकाराने अगदीच खोचक प्रश्न राणेंना विचारताना म्हणाली, 'नारायण राणे ज्या पक्षामध्ये जातात त्या पक्षाची सत्ता जाते, अशी टीका होते.' याप्रश्नावर राणेंनी तिच्याकडे हसून पाहत 'सत्ता जात नाही येते,' असे उत्तर दिले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

(सौजन्यः बीबीसी)

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी 16 ऑक्टोबरच्या कणकवलीच्या सभेत राणेंवर टीका केली होती. 'नारायण राणे ज्या पक्षात जातात त्या पक्षाची वाट लागते. त्यांनी काँग्रेसची विल्हेवाट लावली आणि आता ते भाजपात गेले आहेत. राणेंच्या भाजप प्रवेशाबद्दल माझ्याकडून भाजपला शुभेच्छा', असा टोला लगावला होता. 'मित्राच्या घरात चोर घुसत असताना शांत बसणे शक्य नाही. मी येथे टीका करण्यासाठी आलो नाही तर भाजपला सावध करण्यासाठी आलो आहे,' असेही ठाकरे म्हणाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: narayan rane answers the question ask by women journalist video viral