'साहेब तुम्हाला पण मुलं आहेत...', दिशा सालियन प्रकरणी ठाकरेंचा दोन वेळा फोन, राणेंचा गौप्यस्फोट

Narayan Rane News: नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. दिशा सालियन प्रकरणी त्यांनी गौप्यस्फोट केला आहे.
Narayan Rane
Narayan RaneESakal
Updated on

मुंबई: महाराष्ट्रात संतप्त वातावरण आहे. पण हे हेतूपरस्पर आहे. हे रचलेलं षडयंत्र आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले म्हणजे मिंदे? जेव्हा तुमच्याकडे असताना बॅगा पोहचवत होता तेव्हा ते चांगले होते. एकनाथ शिंदेनी ठरवलं तर महाराष्ट्र अस्थिर करतो म्हणून ते तुमच्या विरोधात तडीपारीची नोटीस काढू शकतात. मी असतो तर कधीचं केल असतं, असं म्हणत खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी दिशा सालियन प्रकरणी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com