Narayan Rane : महाराष्ट्राला निकामी मुख्यमंत्री लाभला होता; नारायण राणेंची सडकून टीका

narayan rane
narayan raneesakal

मुंबईः केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या बारसू दौऱ्यावरुन जोरदार टीका केली आहे. ज्यांनी अडीच वर्षांमध्ये साधा एक प्रकल्प कोकणासाठी आणला नाही ते आज आलेल्या प्रकल्पाला विरोध करीत आहेत, अशा शब्दांत राणेंनी टीकास्र सोडलं.

पत्रकार परिषदेमध्ये बोलतांना नारायण राणे म्हणाले की, बारसू येथे उद्धव ठाकरे रिफायनरीच्या प्रस्तावित जागेत पोहोचले आणि ते सोलगावले गेले. त्यांच्या सभेला परवानगी नाकाली असल्याने मीही माझा दौरा रद्द केला आहे. प्रकल्प सुरु केला तर महाराष्ट्र पेटवू असं उद्धव ठाकरे म्हणत आहेत. परंतु यांनी कोकणासाठी काहीच केलेलं नाही. मुख्यमंत्री असतांना ते निव्वळ निकामी होते. महाराष्ट्राला एक निकामी मुख्यमंत्री लाभला होता, ते केवळ अडीच वर्षात दोनदा मंत्रालयात गेल्याचा पुनरुच्चार राणेंनी केला.

narayan rane
Droupadi Murmu: राष्ट्रपतींच्या भाषणावेळी अचानक गेली लाईट, अन्...; सुरक्षा रक्षकांची पळापळ

काय म्हणाले नारायण राणे?

  • शिवसेनेची अवस्था आज कमी तकादीचा कमी संख्या असलेला पक्ष आहे

  • मुख्यमंत्री असतांना उद्धव ठाकरे दोनदा मंत्रालयात गेले

  • आता मात्र पेटवण्यासाठी हेलिकॉप्टरमध्ये फिरत आहेत

  • शिवसेनेने कोकणात कायम विकासकामांना विरोध केला

  • अडीच वर्षात त्यांनी कोणताच प्रकल्प कोकणात आणला नाही

  • उद्धव ठाकरेंचं कोकणाच्या विकासात अजिबात योगदान नाही

  • जैतापूरच्या विरोधासाठी ५०० कोटींचा डील झाली होती

  • त्यांनी कोळश्याच्या उद्योगपतींकडून ५०० कोटी घेतले होते

  • संजय राऊत म्हणाले वाटणी झाली होती

  • राऊत दारु पिल्यासारखं काहीही बोलत आहेत

  • सध्या ठाकरे-राऊत डिप्रेशनमध्ये गेले आहेत

  • उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या इतिहासत एकमेव निकामी मुख्यमंत्री

  • खोक्यांचं काय बोलता 'मातोश्री'मध्ये काय चालतं आम्हांला माहिती आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com