'खेळवत ठेवणं हेच शरद पवारांचं काम'; नारायण राणेंची खोचक टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'खेळवत ठेवणं हेच शरद पवारांचं काम'; नारायण राणेंची खोचक टीका

परिवहन मंत्री जरी कोकणचे असले तरीही त्यांना कोकणी माणसाबद्दल आत्मीयता नाही - नारायण राणे

'खेळवत ठेवणं हेच शरद पवारांचं काम'; नारायण राणेंची खोचक टीका

sakal_logo
By
रुपेश हिराप

सावंतवाडी - एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांकडे सरकार गांभीर्याने न पाहता त्यांना खेळवत आहे. त्यामुळे केंद्राच्या माध्यमातून यातून मार्ग काढण्यासाठी मी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याची ग्वाही केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिली. ज्यांनी महाविकास आघाडी सरकार बनविल ते राष्ट्रवादीचे शरद पवार अधिकार वाणीने सरकारला न्याय देण्याबाबत सांगू शकले होते, मात्र ते तसे करणार नाही, खेळवत ठेवणे हेच त्याच काम आहे अशी टीकाही राणे यांनी यावेळी केली.

सावंतवाडी येथे कार्यकर्ता मेळाव्यासाठी आलेल्या नारायण राणे यांनी एसटी आगारालगत सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जि.प. अध्यक्षा संजना सावंत, महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर, प्रमोद कामत यांसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा: वानखेडेंनी माझ्या मुलाला खोट्या प्रकरणात अडकवलं, निवृत्त ACP चा आरोप

ते म्हणाले, एसटी महामंडळ हे महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत येते. मात्र, गेले पंधरा दिवस आपल्या न्याय मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असूनही राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. आतापर्यंत सुमारे ४० कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या असून अतिशय भयावह परिस्थिती त्यांच्या घरी आहे. त्यामुळेच राज्यपालांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे. राज्य सरकार विलिनीकरण एवढ्या दिवसात करू असे सांगत आहे, मात्र तोपर्यंत पगार वाढ व अन्य मागण्या पूर्ण करता आल्या असत्या मात्र राज्य सरकारला ते करायचेच नाही आहे.

राणे पुढे म्हणाले, विलीनीकरणाचा मुद्दा सोडवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट का पाहता ? तुम्ही कमी पडलात का? असा सवाल करतानाच परिवहन मंत्री यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घ्यायला हवा. मुख्यमंत्री नाहीत म्हणून प्रश्न ताटकळत ठेवता येणार नाहीत. परिवहन मंत्री जरी कोकणचे असले तरीही त्यांना कोकणी माणसाबद्दल आत्मीयता नाही. ते केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे 'कलेक्टर' आहेत, तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे कोणत्याही बाबतीत कधीही तोडगा काढणार नाहीत. खेळवत ठेवणं हेच त्यांचं काम आहे. वास्तविक ज्यांनी सरकार बनवलं ते शरद पवार या कर्मचाऱ्यांना न्याय द्या असं सरकारला अधिकार वाणीने सांगू शकत होते. मात्र ते असं कधीही करणार नाहीत. कारण त्यांना प्रश्न सोडवायचेच नाहीत.

हेही वाचा: झी न्यूज आणि टाइम्स नाऊवर कारवाई; चुकीच्या आणि एकांगी वार्तांकनावर ठपका

loading image
go to top