नारायण राणेंच्या अडचणी संपेनात, आता BMC ने पाठवली कारणे दाखवा नोटीस

Narayan rane gets show cause notice by bmc mumbai municipal corporation for unauthorized construction
Narayan rane gets show cause notice by bmc mumbai municipal corporation for unauthorized construction sakal

महाराष्ट्रातील दिग्गज भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC) त्यांना त्यांच्या बंगल्यातील बेकायदा बांधकामाबाबत कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.

नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू इथं Adhish नावाचा बंगला आहे. यापूर्वी बीएमसीचे काही अधिकारी त्यांच्या जुहू येथील 'आधीश' या बंगल्याची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यांना त्यांच्या बंगल्यात काही बांधकाम बेकायदेशीर आढळले आहे. या बेकायदा बांधकामाप्रकरणी त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. यावर नारायण राणेंचा जाब मागवण्यात आला आहे. उत्तर देण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. आता या नोटिशीला नारायण राणे काय उत्तर देतात हे पाहाण्यासारखे असेल.

या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. दरम्यान सूत्रांनी दावा केला आहे की राणेंच्या कायदेशीर टीमने या प्रकरणी सुनावणीची मागणी केली असून त्यानंतर बीएमसी घरावर प्रत्यक्ष कारवाई होऊ शकते. 21 फेब्रुवारी रोजी बंगल्याची पाहणी करण्यासाठी बीएमसीची टीम आली होती. या टीममध्ये बीएमसी (BMC) च्या नऊ अधिकाऱ्यांचा समावेश होता. या पथकाने दोन तास राणेंच्या बंगल्याची पाहणी केली. यानंतर राणेंच्या अधीश बंगल्यात फ्लोर स्पेस इंडेक्सचे (एफएसआय) उल्लंघन आढळून आले.

Narayan rane gets show cause notice by bmc mumbai municipal corporation for unauthorized construction
मोदींचं धावत्या मेट्रोमधून अभिवादन; सचिन सावंत म्हणतात, "तुच्छ जनता.."

राणे यांनी महापालिकेची परवानगी न घेता बंगल्यात काही फेरफार केल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी बीएमसी आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याकडे केली होती. राणेंच्या बंगल्याची पाहणी केल्यानंतर पालिकेच्या पथकाने त्यासंबंधी काही प्रश्न उपस्थित केले होते. बंगल्याची पाहणी केल्यानंतर त्यासंबंधीचा अहवाल आयुक्त चहल यांना पाठवण्यात आला. यानंतर राणेंना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

के-पश्चिम वॉर्डच्या नियुक्त बीएमसी अधिकाऱ्याने ही नोटीस सर्व्हिस एरिया, स्टोअर एरिया आणि बेसमेंट पार्किंगमधील वापरातील अनधिकृत बदल निदर्शनास आणले आहेत. तसेच बेकायदेशीरतेमध्ये पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील गार्डन टेरेस आणि चौथ्या, पाचव्या, सहाव्या आणि आठव्या मजल्यावर तयार केलेल्या खोल्यांचा समावेश आहे. नोटीसमध्ये म्हटले आहे की, टेरेसवर पॅसेजचा भाग खोली म्हणून वापरला गेला होता, जो बेकायदेशीर आहे. कोस्टल रेग्युलेशन झोन (सीआरझेड) नियमांचे उल्लंघन, पूर्वीच्या नागरी जमीन कमाल मर्यादा कायदा आणि अतिरिक्त एफएसआयचा बेकायदेशीर वापर अशा विविध तक्रारी आरटीई राणेंच्या घराच्या विरोधात केल्या आहेत.

Narayan rane gets show cause notice by bmc mumbai municipal corporation for unauthorized construction
Google Map चे भन्नाट फीचर, वाचवेल तुमचे पैसे; जाणून घ्या सविस्तर

याआधी शनिवारी दिशा सालियन प्रकरणी नारायण राणे यांना त्यांच्या जबाब नोंदवण्यासाठी मालवणी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. मात्र त्यांची 9 तास चौकशी करण्यात आली. सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर असलेल्या दिशा सालियन हिने आत्महत्या केली नसून, तीन-चार जणांनी तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केल्याचे वक्तव्य नारायण राणे यांनी केले होते. दिशा सालियनची जिथे हत्या झाली तिथे एक मंत्रीही आपल्या सुरक्षा रक्षकांसह उपस्थित असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

Narayan rane gets show cause notice by bmc mumbai municipal corporation for unauthorized construction
Jio चे 365 दिवसांचे प्लॅन, मिळते फ्री कॉलिंग, दररोज 3GB पर्यंत डेटा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com