केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक
Updated on

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेलं वक्तव्य नारायण राणे यांना भोवलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड पोलिसांनी अटक केली आहे. नाशिक, पुणे आणि महाडमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. पुणे आणि नाशिक पोलिसांचं पथक राणे यांना अटक करण्यासाठी रत्नागिरीला पोहचलं. रत्नागिरी सत्र नायालयाने जामीन फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात राणेंनी अर्ज केला होता. मात्र, तातडीने सुनावनी करण्यास न्यायालयाने नकार दिला.

नारायण राणेंच्या विरोधात कलम ५००, ५०२, ५०५, १५३ (अ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राणेंच्या विधानानं समाजात द्वेष, तेढ निर्माण होऊ शकतो, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी आशयाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे.

संगमेश्वर येथील गोळवलीमध्ये नारायण राणे यांना ताब्यात घेऊन अटकेची प्रक्रिया सुरु झाली आहे. ही प्रक्रिया सुरु झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी राडा घातला आहे. संगमेश्वर येथील भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

काय म्हणाले होते राणे?

राज्याच्या मुख्यमंत्र्याला देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे विचारावे लागते. मी तिथे असतो तर कानाखालीच वाजवली असती,’’ असे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. जन आशीर्वाद यात्रेनिमित्त राणे यांनी महाडमधील पूरग्रस्तांशी संवाद साधल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, की प्रगत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी असा मुख्यमंत्री असणे ही महाराष्ट्राची अधोगती आहे. कोणत्याही विषयाचे ज्ञान त्यांना नाही. आपल्याला माहीत नसेल तर सचिवाला विचारावे. त्यादिवशी स्वातंत्र्याचा हीरक महोत्सव आहे काय, असे त्यांनी कोणाला तरी विचारले. देशाचा कितवा स्वातंत्र्यदिन आहे, हे त्यांना माहीत नाही. माझ्यासारखा तिथे असता तर कानाखालीच वाजवली असती. बाळासाहेबांच्या आदर्शाला तिलांजली देऊन गद्दारी करीत ते मुख्यमंत्री झाल्याची टीकाही राणे यांनी केली. पूरग्रस्तांबाबत राज्य सरकार योग्य मदतकार्य करत नसल्याचाही आरोप त्यांनी केला.

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी नेमकं काय झालं होतं? -

आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. पण त्यानंतर भाषणाच्या दरम्यान त्यांचा गोंधळ उडाला. हा नक्की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे की हिरक महोत्सव असा प्रश्न त्यांना पडला होता. यावेळी त्यांच्यामागे उभे असलेले मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना त्यांनी या संदर्भात विचारणा केली. तेव्हा कुंटे यांनी हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असल्याचे सांगितले. त्यानंतर मग मुख्यमंत्र्यांनी आपले भाषण पूर्ण केले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

GMRT Telescope Leads to Discovery of Five New Pulsars in Ancient Galactic Clusters
Latest Marathi News Live Update
Just 15 Days Before Leave, Soldier Arjun Jadhav Attains Martyrdom in Uri Sector
Farmer
Marathi News Esakal
www.esakal.com