राणेंचा 'स्वाभिमान' अजून टिकून; भाजप प्रवेशाचा मुहूर्त टळला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाचा आजचा मुहुर्त टळला आहे. आता प्रवेश कधी होणार याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. 

सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाचा आजचा मुहुर्त टळला आहे. आता प्रवेश कधी होणार याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. 

राणे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. राणेंनीही तसेच जाहीर केले आहे; मात्र पक्षप्रवेश अद्याप झालेला नाही. आज मुंबईत हा प्रवेश होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. युती झाली तर राणेंच्या पक्षप्रवेशात अडचणी येतील अशीही शक्यता होती.

आज मुख्यमंत्र्यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परीषदेत युतीचा निर्णय लवकरच होईल असे जाहीर केल्याने राणेंंच्या भाजप प्रवेशाबाबत पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे. 
दरम्यान, सिंधुदुर्गातील काही प्रमुख राणे समर्थक पदाधिकारी मुंबईकडे रवाना झाले आहे. भाजपकडून अद्याप राणेंच्या प्रवेशाबाबत कोणत्याही वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narayan Rane not to decide include BJP