esakal | 'ज्यांनी कॅमेरा उघडण्यापलिकडे काही केलं नाही'; राणेंचा हल्लाबोल
sakal

बोलून बातमी शोधा

'ज्यांनी कॅमेरा उघडण्यापलिकडे काही केलं नाही'; राणेंचा टोला

'ज्यांनी कॅमेरा उघडण्यापलिकडे काही केलं नाही'; राणेंचा टोला

sakal_logo
By
विराज भागवत

"संजय राऊतांनी नशामुक्तीची सुरूवात मालकाच्या घरापासून करावी"

मुंबई: भाजपच्या माहीम येथील कार्यालयात एक कार्यक्रम झाला. त्यात भाजप आमदार प्रसाद लाड आणि नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली. यावर उत्तर देताना, 'टीका करणाऱ्यांसाठी राज्यात नशामुक्तीची मोहिम राबवावी लागेल', असे उत्तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले. तर, 'सेनाभवन फोडण्याची भाषा करणाऱ्यांना एका थापड दिली तर ते खाली पडतील', असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. या दोन्ही नेत्यांनी आमदार नितेश राणे यांनी उत्तर दिलं. (Narayan Rane son Nitesh Rane troll CM Uddhav Thackeray Shivsena Sanjay Raut in Comedy way vjb 91)

हेही वाचा: 'केवळ मुंबईसाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी हा अभिमानाचा क्षण'

"मुख्यमंत्री हे एका जबाबदार पदावर आहेत. ते काय बोलत आहेत याचा त्यांनी विचार करून बोललं पाहिजे. ज्या व्यक्तीने एक माशी मारली नाही किंवा कॅमेरा उघडण्यापलिकडे काही केलं नाही, त्या उद्धव ठाकरे यांनी मोठीमोठी इशाराची भाषा करू नये", अशी शब्दात राणेंनी उद्धव यांची खिल्ली उडवली. "देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय की तोडफोड करणे ही आमची संस्कृती नाही. पण जर कोणी अंगावर आलं, तर आम्ही शांत बसणार नाही", असा इशारा त्यांनी दिला.

हेही वाचा: "बरोबर ना राऊतसाहेब?"; 'त्या' ट्वीटवरून राणेंचा शिवसेनेला खोचक टोला

"बीडीडी चाळीच्या प्रकल्पाचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. सगळे कंत्राटदार त्यांनी नेमले होते. त्यावेळीच भुमिपूजनही झालं होतं. पण आज हे नालायक लोक जमले. चांगल्याला चांगले म्हणावं हा माणुसकी धर्म आहे पण या लोकांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव सुद्धा घेतले नाही", हे त्यांनी निदर्शनास आणले.

हेही वाचा: सरकारला ना सर्वोच्च न्यायालयाची तमा ना विद्यार्थ्यांची काळजी!

"शिवसेना भवन फोडण्याबाबत प्रसाद लाड यांनी जे वक्तव्य केलं होतं ते कार्यकर्त्यांच्या हितासाठी ते बोलले होते. त्यांनी कोणाचाही अनादर केलेला नाही. त्यांनी स्वत: या विधानावर त्यांचे स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे तो विषय आता संपलेला आहे असं मला वाटतं. पण तरीही जर संजय राऊत बोलत असतील की 'नशामुक्त महाराष्ट्र' झाला पाहिजे, तर मात्र कलानगरपासून म्हणजेच त्यांच्या मालकाच्या घरापासून त्यांनी सुरूवात करावी", असेही टोला त्यांनी लगावला.

loading image
go to top