esakal | नारायण राणे आज पोलिसांसमोर लावणार हजेरी, आजच नोंदविणार जबाब
sakal

बोलून बातमी शोधा

Narayan Rane

नारायण राणे आज पोलिसांसमोर लावणार हजेरी, आजच नोंदविणार जबाब

sakal_logo
By
टीम ई सकाळ

रायगड : स्वातंत्र्य दिनाच्या भाषणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane controversy) यांनी वादग्रस्त व्यक्तव्य केले होते. त्यानंतर राणेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. महाड न्यायदंडाधिकाऱ्यांनी नारायण राणे यांना सशर्त जामीन दिला होता. न्यायालयाने राणे यांना 30 ऑगस्ट रोजी अलिबाग पोलिसांत हजेरी लावण्याचा आदेश दिला होता. राणे हजर राहणार की नाही? अशी चर्चा होती. मात्र, आता राणे आज अलिबागमधील पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयात हजेरी लावणार असल्याची माहिती आहे. आजच त्यांचा जबाब नोंदविला जाणार आहे.

हेही वाचा: जन आशीर्वाद यात्रेनंतर नारायण राणे दिल्लीला रवाना

जन आशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्दात विधान केल्यानंतर शिवसैनिक संतापले होते. राज्यातील विविध पोलिसांत तक्रार आणि गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमिवर पोलिसांनी कारवाई करत राणेंना अटक केली होती. त्यानंतर राणेंना सशर्त जामीन मंजूर झाला होता. राज्यात शिवसेना विरुद्ध राणे असा वाद पेटला आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. आता राणे अलिबागमध्ये उपस्थित राहणार असल्याने मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. गेल्या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना विरुद्ध राणे असा वाद आणि चर्चा रंगली होती. याच्याच दुसऱ्या अंकाला आजपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे.

जामीन देताना कोर्टाने काय म्हटले होते?

  • 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर नारायण राणे यांना जामीन मिळाला आहे. अटकेसाठी पोलिसांनी आवश्यक प्रक्रिया पार न पाडल्यानं जामीन मिळाला.

  • 30 ऑगस्ट आणि 13 सप्टेंबर रोजी नारायण राणे यांना रायगड गुन्हे शाखेत हजेरी लावावी लागणार आहे.

  • नारायण राणेंनी साक्षीदारांवर दबाव टाकू नये, राणेंना आपल्या आवाजाचे नमुने सादर करावे लागणार

  • नारायण राणेंनी पुराव्यांशी छेडछाड करु नये.

loading image
go to top