Vidhan Sabha 2019 : नारायण राणेंचं ठरलं; 'स्वाभिमान' करणार भाजपमध्ये विलीन!

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

- महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष करणार भाजपमध्ये विलीन.

सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या 15 ऑक्टोबरला कणकवलीत प्रचारासाठी येणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत नारायण राणे त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करणार आहेत. याबाबतची घोषणाच नारायण राणे यांनी स्वत: आज (गुरुवार) केली. 

नारायण राणे यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. मात्र, त्यांच्या भाजपप्रवेशात अनेक अडचणी येत आहेत. तसेच त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता खुद्द नारायण राणे यांनीच यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यामध्ये ते म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत नारायण राणे त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करणार आहे. याशिवाय पक्ष विलीनीकरणानंतर भाजप ज्या ठिकाणी मला सभेसाठी पाठवेल तिथे जाऊन मी सभा घेईन, असेही नारायण राणे यांनी सांगितले. 

Vidhan Sabha 2019 : पंकजा मुंडेच म्हणतात, परळीत टफ फाईट होईल

युती तुटण्याला शिवसेनाच जबाबदार

कणकवलीतील भाजप-शिवसेनेची युती तुटण्याला शिवसेनाच जबाबदार आहे, असा आरोपही राणेंनी यावेळी केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narayan Rane will merge his Maharashtra Swabhimaan Paksh with BJP