Vidhan Sabha 2019 : पंकजा मुंडेच म्हणतात, 'परळीत टफ फाईट होईल'

Pankaja munde press Conference in aurangabad
Pankaja munde press Conference in aurangabad

औरंगाबाद - परळीमध्ये बहिनीचीच हवा, तरी चांगली फाईट होईल, असे महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. परळीमध्ये काय सुरु आहे, असा प्रश्‍न मंत्री पंकजा मुंडे यांना विचारला असता. परळीत बहिनीचीच हवा आहे, असे उत्तर त्यांनी दिले. त्यानंतर निवडणुकी एकतर्फी होईल का? असा प्रश्‍न उपस्थित केला असता, चांगली फाईट होईल, असे मुंडे यांनी बोलून दाखविले.

मी, मुख्यमंत्री व्हावे, ही माझी नव्हे तर कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र, त्या कार्यकर्त्यांना आपण ओळखत नाही. शिवाय, आपण तसा दावाही केला नाही, असे महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज (ता.10) स्पष्ट केले.

दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे काय बोलल्या?

आपली ही तिसरी टर्म असल्याने भाजपची प्रथा परंपरा आपल्याला अवगत असल्याने असे करून काही होत नसते, अशी प्रतिक्रीया त्यांनी गुरुवारी (ता.10) व्यक्‍त केली. भाजपाचे नवे धोरण माध्यमासमोर ठेवण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री मुंडे यांनी आत्तापर्यंत केलेल्या कामांची यादीच समोर ठेवली. त्यानंतर पत्रकारांनी आपण मुख्यमंत्री व्हावे, अशी मागणी होत आहे? त्यावर त्या म्हणाल्या, भगवानबाबा यांच्या जन्मगावी सावरगाव येथे झालेल्या दसरा मेळाव्यात पक्षनेतृत्वासमोर काही कार्यकर्त्यांनी तशा भावना व्यक्‍त केल्या. मात्र, आपण त्या कार्यकर्त्यांना ओळखत नाहीत. यापूर्वी आपण मुख्यमंत्रीपदाबद्दल बोलल्याचा आरोप केला गेला. खरं तर मंत्री विनोद तावडे यांनी तसे काहीतरी वक्‍तव्य केले होते. मात्र, आपण ते वक्‍तव्य कधीच स्विकारले नाही, असेही पंकजा मुंडे यांनी नमुद केले.

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे कशामुळे दुरावले

मुख्यमंत्री पदाबद्दल बोलल्यामुळेच राज्यातील प्रभावी ओबीसी नेते असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासमोर अनेक अडचणी निर्माण केल्या. आता राज्यातील महत्वाचा ओबीसी चेहरा म्हणून तुम्ही पुढे येत आहात, त्यामुळे तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात, असा प्रश्‍न विचारला असता. ते आपल्याला काही माहित नाही, असे उत्तर त्यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com