Dabholkar Murder Case Timeline: नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाचा 10 वर्षांनंतर लागणार निकाल? आतापर्यंत काय घडामोडी घडल्या?

Narendra Dabholkar Murder Case: दाभोलकर यांची भर दिवसा झालेली हत्या ही पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रासाठी मोठी धक्क्याची गोष्ट होती.
Narendra Dabholka
Narendra Dabholka

मुंबई- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला जवळपास ११ वर्ष झाली आहेत. १० मे रोजी त्यांच्या हत्येप्रकरणी निकाल लागण्याची शक्यता आहे. दाभोलकर यांची भर दिवसा झालेली हत्या ही पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रासाठी मोठी धक्क्याची गोष्ट होती. पुण्यातील विशेष न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे.

२० ऑगस्ट २०१३ रोजी ६८ वर्षीय दाभोलकर सकाळी फिरण्यासाठी बाहेर गेले होते. पुणे ओंकारेश्वर पुलावर असताना मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळ्या चालवल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. आरोपींनी त्यानंतर मोटारसायकल तिसऱ्या एका व्यक्तीकडे सोपवली आणि ते औरंगाबाद म्हणजे आताच्या छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले होते. दाभोलकर प्रकरणामध्ये २०१३ पासून आतापर्यंत काय काय झालं हे जाणून घेऊया.

Narendra Dabholka
Dabholkar Murder Case: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या खटल्याचा उद्या निकाल; पाच आरोपींवर चालला खटला

नरेंद्र दाभोलकर हत्या घटनाक्रम

२० ऑगस्ट २०१३ - डॉ. नरेन्द्र दाभोलकर यांची शिंदे पुलावर हत्या

३० ऑगस्ट २०१३- सुमारे आठ कोटी फोन कॉल्स व ई मेल्सची तपासणी

२ सप्टेंबर २०१३ - रेखाचित्र तयार व १७ संशयित ताब्यात

१९ डिसेंबर २०१३ - गुन्ह्यात शस्त्रे पुरवल्याबद्दल ठाण्याच्या मनीष नागोरी व विकास खंडेलवाल याना अटक

१३ मार्च २०१३ - नागोरी व खंडेलवाल यांची ओळखपरेड

९ मे २०१४ - केंद्रीय गुप्तचर विभागाकडे (सीबीआय ) तपास वर्ग

३१ डिसेंबर २०१६ - सनातन प्रभातच्या डॉ. वीरेंद्र तावडेच्या व पुण्याच्या सारंग अकोलकरच्या घरावर छापे

११ जून २०१६ - डॉ. वीरेंद्र तावडे याला अटक

१४ जून २०१६ - या गुन्ह्याचा सूत्रधार तावडे असल्याचा 'सीबीआय' चा न्यायालयात दावा

३० नोव्हेंबर २०१६ - वीरेंद्र तावडेंविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

२१ मे २०१८ - पत्रकार गौरी लंकेश यांच्या खुनाप्रकरणी कर्नाटक पोलिसांकडून अमोल काळेला अटक

६ जुलै २०१८- न्यायालयाने तावडेचा जमीन फेटाळला

१० ऑगस्ट २०१८ - दहशतवाद प्रतिबंधक विभागाकडून (एटीएस) मुंबईतून सुधन्वा गोंधळेकर, वैभव राऊत, शरद काळे यांना अटक

१८ ऑगस्ट १८ - 'एटीएस' ने सोडून दिलेल्या सचिन अंदुरेला सीबीआयकडून अटक

३१ ऑगस्ट २०१८ - अमित दिगवेकर व राजेश बंगेरा यांना सीबीआयकसून अटक

४ आकटोबर २०१८ - डॉ. दाभोलकर यांच्यावर शरद कळसकर यानेच गोळी झाडल्याचा सीबीआय चा दावा

१५ सप्टेंबर २०१८ - डॉ. तावडे यांच्यासह पाचजणांविरुद्ध न्यायालयात दोषारोप निश्चित

Narendra Dabholka
Dr. Narendra Dabholkar : नरेंद्र दाभोलकर प्रकरणी आरोपीविरुद्ध पुरावे सिद्ध, जास्तीत जास्त शिक्षा द्यावी; कुटुंबीयांची न्यायालयाकडे मागणी

दाभोलकर यांच्या खुनानंतर आठ वर्षांनी पुण्याच्या विशेष न्यायालयात खटला सुरु झाला. न्यायाधीश सत्यनारायण मुंदडा यांच्या नेतृत्वात १५ सप्टेंबर २०२१ रोजी याप्रकरणी खटला सुरु झाला. याप्रकरणी वीस साक्षीदारांचा जबाब नोंदवण्यात आला होता. न्यायाधीश पी.पी. जाधव यांच्यासमोर खटल्याचे कामकाज पूर्ण झाले. त्यांनी १० मे रोजी निकाल देण्याचे सुतोवाच केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com