मी आणि सचिननेच केला दाभोलकरांवर गोळीबार; कळसकरची कबुली

वृत्तसंस्था
बुधवार, 26 जून 2019

दाभोलकर हत्या प्रकरणात अटकेत असलेला संशयित शरद कळसकर याची न्यायवैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यात त्याने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळीबार केल्याची कबुली दिली. मी व सचिन अंदुरेने गोळीबार केला असे त्याने चाचणीत म्हटले आहे. सीबीआयने या संबंधीचा अहवाल मंगळवारी विशेष न्यायालयात सादर केला.

मुंबई : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना मी आणि सचिन अंदुरे यांनीच गोळ्या झाडल्याची कबुली आरोपी शरद कळसकर याने दिली आहे. असा दावा केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) न्यायालयात केला आहे.

दाभोलकर हत्या प्रकरणात अटकेत असलेला संशयित शरद कळसकर याची न्यायवैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यात त्याने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळीबार केल्याची कबुली दिली. मी व सचिन अंदुरेने गोळीबार केला असे त्याने चाचणीत म्हटले आहे. सीबीआयने या संबंधीचा अहवाल मंगळवारी विशेष न्यायालयात सादर केला. शरद कळसकरने न्यायवैद्यकीय चाचणीत त्याचे वकील संजीव पुनाळेकर यांचे सुद्धा नाव घेतले आहे.

दाभोलकर हत्या प्रकरणात वकील संजीव पुनाळेकर सुद्धा कोठडीत आहेत. पुणे न्यायालयाने संजीव पुनाळेकर यांना सहा जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मागच्यावर्षी जून महिन्यात मी पुनाळेकर यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी मला दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरलेली शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता अशी कबुली कळसकरने न्यायवैद्यकीय चाचणीत दिला आहे. सीबीआयने २५ मे रोजी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना दाभोलकर हत्या प्रकरणात अटक केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narendra Dabholkar Murder Case CBI Claims Accused Sharad Kalaskar Confessed to Crime