
Devendra Fadnavis narrates his first meeting with Prime Minister Narendra Modi in Nagpur, highlighting Modi’s simplicity and leadership style.
esakal
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वा वाढदिवस उद्या, 17 सप्टेंबर रोजी साजरा होत आहे. या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर #MyModiStory अंतर्गत पंतप्रधान मोदींसोबतच्या पहिल्या भेटीची आठवण शेअर केली आहे. या भेटीने फडणवीसांवर कायमस्वरूपी छाप सोडली, जी त्यांनी एका भावनिक व्हिडिओद्वारे व्यक्त केली आहे.