

PM Narendra Modi On Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Incident
पालघर : मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यामुळं महाराष्ट्रातील राजकीय वातावण ढवळून निघालं आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढवण इथल्या जाहीर कार्यक्रमातून माफी मागितली आहे. सिंधुदुर्गात जे काही झालं ते माझ्या सर्व सहकाऱ्यांसाठी दुःखदायक असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं.