Viral Video :'वंदे भारत जनता...'; मोदींसमोर शाळकरी मुलीने गायलं गाणं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

PM Modi in Mumbai :'वंदे भारत जनता...'; मोदींसमोर शाळकरी मुलीने गायलं गाणं Viral Video

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर असून, अवघ्या महिनाभरात पंतप्रधान मोदींचा हा दुसरा मुंबई दौरा आहे. आजच्या मुंबई दौऱ्यात मोदींनी मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी या दोन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी त्यांच्यासमोर शाळकरी मुलीने गाणे गायले आहे.

दरम्यान, या शाळकरी मुलीने 'वंदे भारत जनता हम' हे गाणं गायलं असून तिच्या गायनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. तर टाळ्या वाजवत पुढे निघून गेले. त्याचबरोबर त्यांनी इतर मुलांशीदेखील संवाद साधला आहे. त्यांनी वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर या दोन्ही ट्रेन मार्गस्थ झाल्या आहेत.

हेही वाचा - अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

वंदे भारत ट्रेनची वैशिष्ट्ये

- स्वदेशी तयार, सेमी-हाय स्पीड सेल्फ-प्रोपेल्ड ट्रेन सेट

- १६० किमी प्रतितास वेग गाठण्याची वेळ १४० सेकंद आहे

- प्रवाशांसाठी ३.३(राइडिंग इंडेक्स) सह आरामशीर उत्तम प्रवास.

- स्लाइडिंग फूटस्टेप्ससह स्वयंचलित प्लग दरवाजे आणि टच फ्री स्लाइडिंग दरवाजे

- एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये रिव्हॉल्व्हिंग सीट्स

- वातानुकूलित हवेच्या आवाजरहित आणि समान वितरणासाठी विशेष वातानुकूलित डक्ट

- दिव्यांगजन प्रवाशांसाठी विशेष शौचालय

- टच-फ्री सुविधांसह बायो व्हॅक्यूम टॉयलेट

- ब्रेल अक्षरांमध्ये सीट क्रमांकासह आसन हँडल प्रदान केले आहेत.

- प्रत्येक कोचमध्ये ३२" प्रवासी माहिती आणि इन्फोटेनमेंट सिस्टम

- प्रत्येक कोचमध्ये आपत्कालीन प्रकाश व्यवस्था

- प्लॅटफॉर्म साइड ४ कॅमेरे ज्यात डब्याच्या बाहेर मागील दृश्य चित्रित करणारे कॅमेरे.

- प्रत्येक कोचमध्ये ४ आपत्कालीन खिडक्या

सोलापूर-शिर्डी ला धावणाऱ्या वंदे भारतचा स्पीड किती ?

या गाडीची ताशी १६० किलोमीटर वेगाने धावण्याची क्षमता असली तरी सर्वसाधारण मार्गावर १००-१२० किमी तर घाट परिसरात ताशी ५५ किमी वेगाने चालवण्यात येणार आहे. या गाडीला लोकल ट्रेनच्या तुलनेत तिपटीहून अधिक क्षमतेच्या इलेक्ट्रिक मोटार लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे गाडीला ३६०० हॉर्स पॉवर एवढी ताकद मिळणार असल्याची माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकान्याने दिली.

टॅग्स :Narendra Modiviral video