नाशिकमधून मोदी फुंकणार विधानसभेचे रणशिंग; करणार मोठी घोषणा  

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

सरकारच्या पाच वर्षांच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडण्यासाठी एक ऑगस्टपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप गुरुवारी (ता. 19) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत साधुग्राम मैदानावर होणार आहे.

नाशिक - सरकारच्या पाच वर्षांच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडण्यासाठी एक ऑगस्टपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप गुरुवारी (ता. 19) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत साधुग्राम मैदानावर होणार आहे. यानिमित्ताने भाजपकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. तसेच, विधानसभा निवडणुकीचा नारळदेखील यानिमित्ताने फुटणार आहे. 

 

Video : आपल्या डोळ्यासमोरच भाजप-संघाची समाप्ती होईल : मेवाणी

पंतप्रधानांच्या सभेसाठी नाशिक सज्ज झाले असून, ओझर विमानतळ ते मीनाताई ठाकरे क्रीडासंकुल व साधुग्राम मैदानापर्यंतच्या भागाला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. महाजनादेश यात्रेचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर सर्वांचे लक्ष पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाकडे लागले आहे. गुरुवारी दुपारी बारा वाजता सभा सुरू होईल. सभेसाठी भव्य 12 डोम उभारण्यात आले आहेत. सभेच्या निमित्ताने आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. 

नाशिकसाठी घोषणा शक्‍य 
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची घोषणा कुठल्याही क्षणी होण्याची शक्‍यता असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नाशिकसाठी व राज्यासाठी विशेष घोषणा होण्याची शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narendra Modi Nashik Rally Mahajandesh Yatra ends today at Sadhugram Maidan in presence of Prime Minister