नाशिक पदवीधर निवडणुकीत पुन्हा ट्विस्ट येणार; बावनकुळेंच्या विधानानं चर्चांना उधाण

नाशिक पदवीधर निवडणुकीत भाजप नेमका कुणाला पाठिंबा देणार याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule Sakal

Nashik Division Graduates constituency Update : नाशिक पदवीधर निवडणुकीत भाजप नेमका कुणाला पाठिंबा देणार याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

Chandrashekhar Bawankule
मोहसीन शेख हत्या प्रकरण : हिंदू राष्ट्रसेनेच्या अध्यक्षांसह २० जणांची निर्दोष मुक्तता

हा सस्पेन्स कायम असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक मोठ विधान केले आहे. त्यांच्याया विधानामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.

Chandrashekhar Bawankule
Adani Group : अडचणीत आणणाऱ्या Hindenburg विरोधात अदानी कायदेशीर कारवाईच्या विचारात

नाशिकमध्ये भाजपचा उमेदवार नाही, आणि अपक्ष उमेदवार असलेल्या सत्यजित तांबेंनेही पाठिंबा मागितलेला नाही. त्यामुळे भाजपचा मतदार मविआला मतदान करणार नाही. मतदान केलचं तर मतदार अपक्षाला मतदान करेल असे वक्तव्य बावनकुळेंनी केले आहे.

बावनकुळेंच्या या सूचक विधानामुळे भाजपचा सत्यजीत तांबेंना पाठिंबा असल्याचे संकेत दिल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Chandrashekhar Bawankule
MVS vs Shinde-Fadnavis : मविआला आणखी एक धक्का; मालाडमधील उद्यानाचे नाव बदलले

फडणवीसांनी फक्त सांगावं, चार तासांत उमेदवार निवडून आणू

दुसरीकडे नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवार म्हणून सत्यजीत तांबे रिंगणात आहेत. तांबेंना भाजपची मदत मिळेल, अशी शक्यता असतांना खासदार सुजय विखे यांचं एक विधान राज्यात चर्चेत आलेलं आहे. ते अहमदनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

Chandrashekhar Bawankule
U19 Cricket World Cup : अखेर 19 वर्षांच्या मुलींनी न्यूझीलंडचा अवघड पेपर सोडवला, गाठली वर्ल्डकपची फायनल

ते म्हणाले की, 'नगर जिल्हा भाजप कार्यकर्त्यांची एवढी ताकद आहे की, आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी रात्री १२ वाजता जरी सांगितलं तरी आम्ही एखादा उमेदवार निवडून आणू शकतो. फक्त चार तासांमध्ये उमेदवार निवडून आणण्याची आमच्यात ताकद आहे. ३० तारखेला मतदान आहे. आम्हाला २९ च्या रात्री १२ वाजता जरी सांगितलं तरी उमेदवार निवडून आणू शकतो.' असं विखे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com