मोहसीन शेख हत्या प्रकरण : हिंदू राष्ट्रसेनेच्या अध्यक्षांसह २० जणांची निर्दोष मुक्तता

पुणे सत्र न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
Mohsin Shaikh case
Mohsin Shaikh case Sakal

Mohsin Shaikh Murder Case Update : पुण्यातील मोहसीन शेख हत्येप्रकरणातील आरोपी हिंदू राष्ट्रसेनेचा अध्यक्ष धनंजय देसाईंसह सर्व २० आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. (Pune Session Court Relive All Accused of Mohsin Shaikh Murder Case )

पुणे सत्र न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. २ जून २०१४ ला पुण्यातील हडपसर परिसरात मोहसीन शेखची हत्या करण्यात आली होती.

२ जून २०१४ रोजी पुण्यातील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या मोहसीन शेखची जमावाने हत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाईंसह २३ जणांना येरवड्यातून अटक केली होती. 

Mohsin Shaikh case
Go First : Air India पाठोपाठ DGCA ची 'गो फर्स्ट' वर मोठी कारवाई; ठोठावला १० लाखांचा दंड

२०१४ मध्ये आक्षेपार्ह पोस्टमुळे पुण्यात तणाव निर्माण झालेला होता. यावेळी आयटी क्षेत्रातील अभियंता असलेला मोहसीन शेखची हत्या करण्यात आली होती.

या प्रकरणी पोलिसांनी हिंदू राष्ट्रसेनेच्या धनंजय देसाईंसह २३ जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. सोलापूरमधील काही तरुणांनी 'जस्टिस फॉर मोहसीन' ही चळवळ देखील सुरू केली होती.

Mohsin Shaikh case
नाशिक पदवीधर निवडणुकीत पुन्हा ट्विस्ट येणार; बावनकुळेंच्या विधानानं चर्चांना उधाण

छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे काही आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर टाकल्यामुळे २ जून २०१४ मध्ये हडपसर मध्ये दंगल झाली होती.

त्यावेळी हिंदू राष्ट्र सेनेने तोडफोड केली होती. याचवेळी मोहसीनला त्याच्या दाढी आणि पेहरावावरून हटकत मारहाण करण्यात आली होती. ज्यात त्याचा मृत्यू झाला होता. २०१९ धनंजय देसाईंना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com