Onion Export Ban : निर्यातबंदीने कांद्याचे 3 हजार 161 कोटींचे नुकसान; राज्यातील स्थिती

Onion Export Ban : देशातील सत्ताधाऱ्यांसाठी कांदा हे राजकीय पीक झाले आहे. यंदा ग्राहकांची कुठलीही ओरड नसताना देशांतर्गत कांदा उपलब्धता व दर नियंत्रणासाठी केंद्राने ८ डिसेंबरपासून थेट निर्यातबंदी लादली.
export ban onion price decreasing
export ban onion price decreasingesakal

Onion Export Ban : देशातील सत्ताधाऱ्यांसाठी कांदा हे राजकीय पीक झाले आहे. यंदा ग्राहकांची कुठलीही ओरड नसताना देशांतर्गत कांदा उपलब्धता व दर नियंत्रणासाठी केंद्राने ८ डिसेंबरपासून थेट निर्यातबंदी लादली. केंद्राने ग्राहकांचे हित यातून साधले. मात्र, गेल्या ९६ दिवसांत (ता. १३)अखेर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे तीन हजार १६१ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. (nashik Onion Export Ban Loss in state marathi news )

केंद्र सरकारने गेल्या वर्षी ऑगस्ट २०२३ पासूनच अधिकारांचा वापर करीत सुरवातीला अर्थ मंत्रालयाच्या माध्यमातून कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क, त्यानंतर प्रतिटन किमान निर्यातमूल्य ८०० डॉलर केले. त्यानंतर थेट मुळावर घाव घालत इतिहासात पहिल्यांदा खरीप कांदा हंगामात निर्यातबंदीचा निर्णय घेतला.

त्यामुळे निर्यातबंदीपूर्वी प्रतिक्विंटल तीन हजार ३०० रुपये असलेले दर एक हजार ८०० रुपयांपर्यंत खाली आले होते. त्यामुळे जानेवारी ते मार्च या कालावधीत क्विंटलमागे एक हजार ५०० ते दोन हजार रुपयांपर्यंत तोटा सोसण्याची वेळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आली. परिणामी, जिरायती भागातील कांदा हे नगदी पीक घेणारे शेतकरी आर्थिक अडचणीत आणले गेले. त्यात नाशिक, अहमदनगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकरी उद्‌ध्वस्त झाला आहे.

ग्राहकांसाठी ‘व्यवहार’; शेतकऱ्यांचे ‘कल्याण’ कुठे?

केंद्र सरकारचे ग्राहक व्यवहारसंबंधी मंत्रालय ग्राहकांना रास्त दरात शेतमाल मिळावा, यासाठी सातत्याने प्रयत्नशील असते. त्यासाठी वेळोवेळी हस्तक्षेप केला जातो. यात ग्राहकधार्जिणे केंद्रातील मंत्री ‘सरकारी बाबू’ यांच्याआडून कागदावर खेळून निर्णय घेत आहेत.(latest marathi news)

export ban onion price decreasing
Onion Export Ban: कांदा निर्यातबंदी विरोधात ‘प्रहार’तर्फे चांदवडला शेतकऱ्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

नोव्हेंबरमध्ये राज्य दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय समितीने कांदा लागवड, उत्पादन व कांदा उपलब्धतेसंबंधी चुकीचा व अतिरंजित माहिती अहवाल केंद्र सरकारला दिला. त्यामुळे निर्यातबंदी झाली. त्याची कबुली भाजपच्या एका जबाबदार नेत्याने दिल्लीत दिली होती. मात्र, सकारात्मक काहीच नाही. शेतकरी तीन महिन्यांपासून दर पडल्याने आक्रोश करीत आहे.

राज्यातील आवक, दर व आर्थिक तोट्याची स्थिती :

महिना...आवक (क्विंटल)...सरासरी दर (रुपये)...तोटा (रुपये)

डिसेंबर (ता. ८ पासून)...५९,२५,५००...१,८५३...८५७,४१,९८,५००

जानेवारी...१९,४६,९५४...१,७९८...२९२,६२,७१,८६४

फेब्रुवारी...७३,७२,५८६...१,३२३...१४५७,५६,०२,५२२

मार्च (ता. १३ अखेर)...३२,६४,१९७...१,६०२...५५४,२६,०६,५०६

export ban onion price decreasing
Onion Export Ban : कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांना अडीचशे कोटींचा फटका

''अचानक निर्यातबंदी करून दर पाडले. त्यामुळे एकरी दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान आहे. पाऊस, गारपीट याच्यातूनही मार्ग काढून दर्जेदार माल बाजारात आणला. मात्र, सरकारच्या चुकीच्या धोरणाने शेतकरी अडचणीत आला आहे.''- निवृत्ती न्याहारकर, कांदा उत्पादक शेतकरी, वाहेगावसाळ (ता. चांदवड)

''निर्यातबंदीनंतर दरात मोठी घसरण होऊन गेल्या सव्वातीन महिन्यांत शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. सरकारने सरसकट निर्यात खुली करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झालेच नाही. निर्यातीच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न निम्म्याने घटून शेतकऱ्यांवरील कर्ज मात्र दुप्पट वाढले आहे.''- भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

export ban onion price decreasing
Onion Export Ban : शेतकऱ्यांच्या पदरी निराशा! कांद्यावरील निर्यातबंदी ३१ मार्चपर्यंत कायम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com