नाशिकमध्ये पत्नीने पतीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या करून पतीचा मृतदेह घरातील शौचालयाच्या शोषखड्ड्यात पुरुन ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल दोन महिन्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली असून हत्येचे कारण समोर आलेले नाही. पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.