National Kho Kho Tournament: राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राला दुहेरी मुकुट!

National School Kho-Kho Championship winning boys and girls team. On recognition of attending the Neighbor Prize Distribution Ceremony.
National School Kho-Kho Championship winning boys and girls team. On recognition of attending the Neighbor Prize Distribution Ceremony. esakal

National Kho Kho Tournament : पंचवटी विभागीय क्रीडा संकुलात खेळविण्यात आलेल्‍या १९ वर्षांखालील ६७ व्‍या राष्ट्रीय शालेय खो- खो स्‍पर्धेत यजमान महाराष्ट्र संघाने साजेशी कामगिरी केली. मुले आणि मुलींच्‍या गटात विजेतेपदाला गवसणी घालताना महाराष्ट्राने स्‍पर्धेत दुहेरी मुकुट राखले.

मुलांमध्ये अंतिम सामन्‍यात पराभव झालेल्‍या केरळ संघाने, तर मुलींमध्ये हरियाना संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.(National School Kho Kho Competition won by Maharashtra girls and boys team nashik news )

स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषदेतर्फे आणि खो- खो फेडरेशनच्या सहकार्याने ही स्‍पर्धा खेळविण्यात आली. स्‍पर्धेत शनिवारी (ता. १६) अंतिम फेरीच्या सामन्‍यांची रंगत पाहायला मिळाली.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण अर्जुन पुरस्कारप्राप्त तथा खो-खोचे राष्ट्रीय खेळाडू व संघटक श्रीरंग इनामदार, न्यू एज्‍युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश वैशंपायन, ‘साई’च्या प्रतिनिधी सुनीता राणी आणि सत्यपासी, रमेश भोसले, आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शैलजा जैन, मुंबईच्या जिल्हा क्रीडा अधिकारी वर्षा शिंदे, प्रशिक्षक अजय पवार आदींच्‍या हस्‍ते झाले. मुलांचा अंतिम सामना केरळविरुद्ध झाला. सामन्यात आक्रमण करताना महाराष्ट्राने केरळचे ११ खेळाडू बाद केले.

बचाव (संरक्षण) करताना केवळ दोन गडी गमावले. मध्यंतराला महाराष्ट्राने नऊ गुणांची आघाडी मिळविली. दुसऱ्या सत्रातही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आक्रमक पवित्रा घेत केरळचे आठ गडी बाद केले. बचाव करताना जोमाने खेळ करून उत्कृष्ट कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या संघाने केरळवर विजय मिळविला. महाराष्ट्राकडून रामचंद्र विलास, चेतन बिका यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. मुलींचा अंतिम सामना हरियानाविरुद्ध खेळविला गेला. सामन्यात महाराष्ट्राच्या मुलींनी सुरवातीपासून चांगला समन्वय राखून आक्रमणात धार आणली.

National School Kho-Kho Championship winning boys and girls team. On recognition of attending the Neighbor Prize Distribution Ceremony.
Cricket : जगज्जेते नेतृत्व असले, तरी धोनीसुद्धा अजेय कर्णधार नव्हता..

पहिल्या सत्रात हरियानाच्या ११ खेळाडूंना बाद केले. बचाव करताना महाराष्ट्राच्या संघाने पहिले फक्त दोन गडी गमावले. मोठी आघाडी मिळविल्याने हरियानाच्या खेळाडूंनी आपला पराभव मान्य केला. या अष्टपैलू खेळामुळे महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने हरियानावर ११-२ असा पराभव करून मुलींमध्येही महाराष्ट्राचा झेंडा मानाने फडकावला. सामन्यात महाराष्ट्राची कर्णधार निशा वैजलने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन केले.

वैष्णवी पोवार, अश्विनी शिंदे, सरिता दिवा, प्रणाली काळे, सुहानी धोत्रे, प्रतीक्षा बिरासदार यांनीही चांगल्‍या खेळाचे प्रदर्शन केले. स्पर्धेसाठी स्कूल गेम्स निरीक्षक म्हणून टी. के. मूर्ती आणि श्रीमती कनक यांनी जबाबदारी सांभाळली. स्पर्धेची तांत्रिक बाजू तांत्रिक समितीप्रमुख प्रेमानंद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पंचांनी चोख पार पाडली. स्पर्धेत प्रत्येक सामन्यासाठी लाइव्ह गुणफलक होते. स्पर्धेच्या प्रत्येक सामन्याचे थेट प्रक्षेपण यू ट्यूब चॅनेलवर झाले.

स्‍पर्धेचा निकाल

मुले : महाराष्ट्र (विजेता), केरळ (उपविजेता). तमिळनाडू (तृतीय), कर्नाटक (चौथे).

मुली : महाराष्ट्र (विजेता), हरियाना (उपविजेता), तमिळनाडू (तृतीय), पश्चिम बंगाल (चौथे).

वैयक्‍तिक पारितोषिके

सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू : मुलींमध्ये निशा वैजल, मुलांमध्ये विराज गळतणे (दोन्‍ही महाराष्ट्र). उत्कृष्ट आक्रमक खेळाडू : मुलांमध्ये चेतन बिका (महाराष्ट्र), मुलींमध्ये सुहानी धोत्रे (महाराष्ट्र). उत्कृष्ट बचावपटू- मुलींमध्ये अश्विनी शिंदे (महाराष्ट्र), मुलांमध्ये मेबीन फ्रान्सिस (केरळ).

National School Kho-Kho Championship winning boys and girls team. On recognition of attending the Neighbor Prize Distribution Ceremony.
National School Kho Kho Tournament: खो-खो स्‍पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद; गुजरात उपविजेता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com