Navneet Rana | "राणा आधी बारमध्ये..."; राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षांचं वादग्रस्त वक्तव्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Navneet Ravi Rana News | Hanuman Chalisa Row
"राणा आधी बारमध्ये..."; राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षांचं वादग्रस्त वक्तव्य

"राणा आधी बारमध्ये..."; राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षांचं वक्तव्य

खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (MP Navneet Rana and MLA Ravi Rana) यांनी हनुमान चालिसा पठणाचा चंगच बांधला आहे. दिल्लीतल्या एका हनुमान मंदिरात जाऊन ते महाआरती करणार आहेत. दरम्यान, या सगळ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण (Vidya Chavan, Nationalist Congress Party) यांनी राणांवर वादग्रस्त शब्दांत टीका केली आहे.

नवनीत राणा आणि रवी राणा आज दिल्लीतल्या हनुमान मंदिरात महाआरती करणार आहेत. त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी नवनीत राणांवर टीका केली आहे. त्या म्हणाल्या, "कुणीही उठसूट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचा अपमान करतो, हे कितपत योग्य आहे? आणि कोण आहेत या नवनीत राणा? त्या आधी बारमध्ये काम करत होत्या. त्यांच्याबद्दल सर्वांना माहित आहे. खोटं जात प्रमाणपत्र दाखवून त्या खोट्या खासदार झाल्यात. त्यांना एवढं महत्त्व द्यायची गरज नाही. माध्यमांमध्ये चर्चेत राहण्यासाठी हे दाम्पत्य असा प्रकार करतंय."

हेही वाचा: "ज्यामुळे तुमची चूल पेटली.."; सभेआधी राणांनी ठाकरेंना पुन्हा डिवचलं!

यावेळी विद्या चव्हाण यांनी रवी राणा यांच्यावरही टीका केली आहे. निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी त्यांनी मतदारांना आमिषं दाखवल्याचंही त्यांनी सांगितलं. चव्हाण म्हणाल्या, "राणा दाम्पत्य अमरावतीत काय करत होतं, हे सगळ्यांना माहित आहे. रवी राणांनी निवडणुकीच्या वेळी मतदारांना कुकर वाटले. पण कुकरला झाकणच नव्हतं. महिला त्यांना विचारायला गेल्या. तर रवी राणा म्हणाले की मला मतं दिल्यानंतर तुम्हाला झाकणं देतो. "

Web Title: Nationalist Congress Party Vidya Chavan On Navneet Rana Hanuman Chalisa Row

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top