Talathi Bharti 2023
Talathi Bharti 2023esakal

Talathi Bharti: तलाठी भरतीत गोंधळ, पुण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

महाराष्ट्राच्या अकोला आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्रावर सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.
Published on

महाराष्ट्रात सध्या वेगवेगळ्या परीक्षा केंद्रावर तलाठी भरतीची परीक्षा घेतली जात आहे. महाराष्ट्राच्या अकोला आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्रावर सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्रासही झाला. याविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि.२१ ऑगस्ट)पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व चौकात आंदोलन केले होते. यावेळी त्यांनी परीक्षेत निर्माण झालेल्या अडचणींचा पाढा वाचून दाखवला. परीक्षेत ऐनवेळी सर्व्हर डाऊन होणे, परीक्षेच्या वेळात बदल होणे, या विद्यार्थ्यांच्या अडचणी या आंदोलनात उचलून धरण्यात आल्या.

Talathi Bharti 2023
Telangana Vidhansabha Election : BRS प्रमुख के.चंद्रशेखर यांनी केली उमेदवारांची यादी जाहीर; स्वत: या जागेवरून लढवणार निवडणूक !

सध्या महाराष्ट्रात तलाठी भरतीतील गैरप्रकारामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. तलाठी भरतीच्या मुद्द्यावरुन विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी बघायला मिळाली होती. राष्ट्रवादी पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी तलाठी भरतीसाठी आकारण्यात येणाऱ्या परीक्षा शुल्काचा मुद्दा उचलून धरला होता.

तलाठी भरतीचे शुल्क आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे शुल्क यावर त्यांनी भाष्य केलं होतं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेचे शुल्क ५०० रुपयांइतके आहे , तर तलाठीची भरतीचे शुल्क १००० रुपये इतके आकारण्यात आले होते.

तलाठी भरतीसाठी नामांकित कंपनी टीसीएस (TCS)कंपनीची निवड करण्यात आली होती. मात्र, तलाठी भरती पेपरफुटी झाल्याने राज्यातील विद्यार्थ्यांनी असंतोष व्यक्त केला होता.

Talathi Bharti 2023
Talathi Exam: तलाठी परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार; गोंधळानंतर महसूल मंत्र्यांचं स्पष्टीकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com