'राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये नॅचरल गॅस पोचविणार'

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 29 जून 2018

मुंबई - येत्या चार ते पाच वर्षांत 30 जिल्ह्यांत गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र (सीजीडी) उभारून नॅचरल गॅस पोचविण्यात येईल, अशी माहिती पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुरुवारी दिली. 

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाकडून मुंबईत आयोजित 9 व्या "गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र' निविदा प्रक्रिया आणि रोड शो दरम्यान ते बोलत होते. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नैसर्गिक वायू नियामक मंडळाचे प्रमुख दिनेश सराफ आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

राज्यात मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर येथे "गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र' आहेत. पुढील टप्प्यात आणखी नऊ जिल्ह्यांमध्ये वायुपुरवठा केला जाईल. अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, नाशिक, लातूर, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, सांगली आणि सातारा या नऊ जिल्ह्यांमध्ये नवी केंद्रे सुरू होणार आहेत. समृद्धी महामार्गासोबतच नॅचरल गॅस लाइन टाकल्यास नागपूर आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये गॅसपुरवठा शक्‍य होणार असल्याचे प्रधान यांनी सांगितले. यातून घरगुती ग्राहकांना गॅसचा पाइपने पुरवठा केला जाणार आहे. पेट्रोलियम मंत्रालयाकडून गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र सुरू करण्यासाठी निविदा मागवण्यात येत आहेत. या संदर्भात आतापर्यंत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने विविध शहरांमध्ये 15 रोड शो घेतले आहेत. गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होण्याचा विश्‍वास सराफ यांनी व्यक्‍त केला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Natural gas will be available in 30 districts of the state